Stock Market Crash : बजेटमधील केवळ 'त्या' एका घोषणेमुळे मार्केटमध्ये खळबळ; सेन्सेक्स 2 हजार अंकांनी कोसळला

Stock Market Crash : केंद्रीय अर्थसंकल्पातील एका घोषणेमुळे शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाल्याचे पहायला मिळत आहे. अर्थसंकल्पात F&O (Future and Options) अंतर्गत STT (Securities Transaction Tax) वाढवण्यात आला आहे. मागील अर्थसंकल्पातही तो वाढवण्यात आला होता. यावेळी तो 0.1 टक्क्यांवरून वाढवून 0.15 टक्के करण्यात आला आहे

Stock Market Crash

Stock Market Crash

मुंबई तक

01 Feb 2026 (अपडेटेड: 01 Feb 2026, 01:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बजेटमधील केवळ 'त्या' एका घोषणेमुळे मार्केटमध्ये खळबळ

point

सेन्सेक्स 2 हजार अंकांनी कोसळला

Stock Market Crash : केंद्रीय अर्थसंकल्पातील एका घोषणेमुळे शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाल्याचे पहायला मिळत आहे. अर्थसंकल्पात F&O (Future and Options) अंतर्गत STT (Securities Transaction Tax) वाढवण्यात आला आहे. मागील अर्थसंकल्पातही तो वाढवण्यात आला होता. यावेळी तो 0.1 टक्क्यांवरून वाढवून 0.15 टक्के करण्यात आला आहे. या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्समध्ये 2000 अंकांची घसरण झाली आहे, तर निफ्टी 700 अंकांनी घसरून व्यवहार करत आहे.

हे वाचलं का?

कॅपिटल सेक्टरमध्येही मोठी पडझड झाली आहे. BSE, Groww सारख्या शेअर्समध्ये हाहाकार उडालेला दिसत आहे. तसेच वेदांता, हिंदुस्थान झिंक आणि हिंदुस्थान कॉपर मध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. निफ्टी 24,800 च्या खाली; तर सेन्सेक्स 80,500 च्या खाली व्यवहार करत आहे.

बीएससी टॉप 30 शेअर्सपैकी केवळ 3 शेअर्समध्ये तेजी आहे, तर 27 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. सनफार्मा, टीसीएस आणि कोटक महिंद्रा सोडून बाकी सर्व शेअर्स सुमारे 8 टक्क्यांपर्यंत तुटले आहेत. ऑटो, फार्मा आणि एफएमसीजी, बँक सेक्टरसह सर्वच सेक्टरमध्ये घसरण आहे. पीएसयु सारख्या सेक्टरमध्येही दबाव असल्याचं पहायला मिळत आहे.

हे ही वाचा : '2047 पर्यंत भारत बनणार ग्लोबल लीडर...' निर्मला सीतारामन यांच्या भाषणातील 10 महत्त्वपूर्ण मुद्दे

STT म्हणजे काय?

शेअर बाजारात कोणतीही मालमत्ता खरेदी आणि विक्री करताना ट्रान्झॅक्शन टॅक्स लागतो, त्याला STT असे म्हटले जाते. यंदाच्या अर्थसंकल्पात STT वाढवण्यात आला आहे. गेल्या वेळच्या अर्थसंकल्पातही यामध्ये वाढ करण्यात आली होती. यावेळी F&O मध्ये कोणताही प्रीमियम खरेदी आणि विक्री करण्यावरील एसटीटी वाढवला आहे.

परदेशी गुंतवणूकदारांसाठी खास घोषणा

अर्थसंकल्पात शेअर बाजारासाठी विशेष घोषणा करण्यात आली आहे. आता PIO (भारतीय वंशाच्या व्यक्ती) ना भारतीय बाजारात गुंतवणुकीची परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच जे भारतीय वंशाचे लोक परदेशात राहतात, ते आता भारतीय बाजारात गुंतवणूक करु शकतात. या मोठ्या घोषणेनंतर परदेशी गुंतवणूकदारांचा भारतात येण्याचा ओघ वाढेल असे मानले जात आहे.

हे ही वाचा : Union Budget 2026: देशाचं बजेट सादर, अर्थसंकल्पातून देशवासियांना काय-काय मिळणार?

'या' शेअर्समध्ये झाली पडझड

बाजार उघडताच हिंदुस्थान झिंकच्या शेअरमध्ये 10%, हिंदुस्थान कॉपर च्या शेअरमध्ये 18 टक्क्यांहून अधिक घसरण, हिंदुस्थान ॲल्युमिनियममध्ये सुमारे 5 टक्के आणि हिंदाल्कोच्या शेअरमध्ये 7 टक्के घसरण पाहायला मिळाली. मात्र, डिफेन्स स्टॉक (संरक्षण क्षेत्र) मध्ये खरेदी दिसून येत आहे. BEL, Data Patterns सारखे शेअर्स सुमारे 2 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. मेटल स्टॉक्समध्येही रिकव्हरी आली असून ते हिरव्या निशाणीत (वाढीसह) व्यवहार करताना दिसत आहेत.

    follow whatsapp