Personal Finance: पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्किम दर महिन्याला मिळवा 9250 रुपये!

Post office Scheme: पोस्ट ऑफिस वेगवेगळ्या वयोगटातील आणि उत्पन्न गटातील लोकांसाठी अनेक बचत योजना चालवते, ज्या केवळ जबरदस्त परतावा देत नाहीत तर सरकार स्वतः गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची हमी देते.

Personal Finance: पोस्ट ऑफिस योजना

Personal Finance: पोस्ट ऑफिस योजना

रोहित गोळे

• 10:55 AM • 04 Jul 2025

follow google news

Personal Finance Tips for Post office Scheme: प्रत्येकजण आपल्या कष्टाने कमावलेले पैसे अशा ठिकाणी गुंतवू इच्छितो जिथे पैसे सुरक्षित असतील आणि परतावा देखील उत्तम असेल. परंतु निवृत्तीनंतर, नियमित उत्पन्नाची चिंता ही एक मोठी समस्या बनते, विशेषतः जेव्हा नोकरीनंतर चांगले पेन्शन नसतं. अशा परिस्थितीत, भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी आगाऊ नियोजन करणे खूप महत्वाचे आहे. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही या समस्येवर एक उत्तम उपाय आहे, जी तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न देतं. या योजनेचे फायदा सविस्तरपणे समजून घेऊया.

हे वाचलं का?

तुमचे POMIS खाते ₹1000 ने करा सुरू 

पोस्ट ऑफिस वेगवेगळ्या वयोगटातील आणि उत्पन्न गटातील लोकांसाठी अनेक बचत योजना चालवते, ज्या केवळ जबरदस्त परतावा देत नाहीत तर सरकार स्वतः गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची हमी देते. यामुळे हा पूर्णपणे तणावमुक्त गुंतवणूक पर्याय बनतो. मासिक उत्पन्न योजनेत, तुम्ही फक्त ₹ 1000 मध्ये तुमचे खाते उघडू शकता.

खाते कोण उघडू शकते आणि त्याचे नियम काय आहेत?

ही योजना 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी आहे. तुम्ही जास्तीत जास्त तीन प्रौढांसह एकल किंवा संयुक्त खाते देखील उघडू शकता. अल्पवयीन आणि मानसिक आजारी व्यक्तींसाठी पालक म्हणून देखील खाते उघडता येते. किमान ₹ 1000 च्या गुंतवणुकीसह खाते उघडता येते.

गुंतवणुकीवर 7.4% व्याज!

पोस्ट ऑफिसची ही योजना त्याच्या फायद्यांसाठी खूप लोकप्रिय आहे आणि त्यात मिळणारे व्याज देखील आश्चर्यकारक आहे. POMIS मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर सरकार 7.4% दराने व्याज देत आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून लागू आहे. या सरकारी योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे आणि खाते उघडल्यानंतर तुम्ही त्यातून एक वर्षापर्यंत पैसे काढू शकत नाही. या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे एकदा गुंतवणूक केल्यानंतर, मासिक उत्पन्नाची तुमची चिंता संपते.

गुंतवणूक ठेव आणि व्याजचे नियम

  • एकाच खात्यात जास्तीत जास्त ₹9 लाख जमा करता येतात.
  • जॉइंट खात्यात जास्तीत जास्त ₹15 लाख जमा करता येतात.
  • जॉइंट खात्यातील सर्व धारकांचा गुंतवणुकीत समान वाटा असावा.
  • खाते उघडल्यानंतर एका महिन्यापासून ते मॅच्युरिटीपर्यंत व्याज मिळत राहतं.
  • जर तुम्ही दरमहा मिळणारे व्याज काढले नाही, तर त्यावर कोणतेही अतिरिक्त व्याज मिळणार नाही.

एकदा गुंतवणूक करा, नंतर दरमहा हमी उत्पन्न

पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना (POMIS) ही प्रत्यक्षात एकच गुंतवणूक योजना आहे. एकदा गुंतवणूक केल्यानंतर, तुम्ही या योजनेअंतर्गत दरमहा स्वतःसाठी हमी उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. खाते उघडल्यानंतर 5 वर्षांनी, संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह अर्ज सादर करून खाते बंद करता येते. जर खातेधारकाचा मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू झाला, तर खाते बंद केले जाते आणि जमा केलेली रक्कम खातेधारकाच्या नामनिर्देशित व्यक्तीला किंवा वारसाला परत केली जाते. परतफेड होईपर्यंत व्याज दिले जाते.

दरमहा ₹ 5500 कमाई

आता आपण या योजनेत एकरकमी गुंतवणूक करून गुंतवणूकदार केवळ व्याजातून दरमहा ₹9,250 मासिक उत्पन्न कसे मिळवू शकतात याबद्दल जाणून घेऊया.

एकल खाते: जर एका खातेधारकाने त्याच्या खात्यात जास्तीत जास्त ₹ 9 लाख जमा केले तर 7.4% व्याजदराने त्याला दरमहा ₹5500 व्याज मिळेल.

संयुक्त खाते: संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ₹15 लाख गुंतवल्यास, मासिक उत्पन्न ₹9,250 होईल.

खाते सहजपणे सुरू करता येतं

गुंतवणूकदार त्यांच्या सोयीनुसार या पोस्ट ऑफिस योजनेत मिळणारे व्याज तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर देखील घेऊ शकतात. या सरकारी योजनेत खाते उघडण्यासाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकता. तुम्ही पोस्ट ऑफिसमधून खाते उघडण्याचा फॉर्म घेऊ शकता आणि तो KYC फॉर्म आणि पॅन कार्डसह सबमिट करू शकता.

मुदतपूर्तीपूर्वी खाते बंद केल्याने होणारे नुकसान

या योजनेत खाते उघडल्यानंतर एक ते तीन वर्षांच्या आत खातेधारकाने खाते बंद केले तर ते तोट्याचे ठरू शकते. अशा परिस्थितीत, नियमानुसार, मूळ रकमेच्या २% इतकी रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम तुम्हाला परत केली जाईल. जर तुम्ही खाते उघडल्यानंतर तीन ते पाच वर्षांच्या आत ते बंद केले तर १% इतकी रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम तुम्हाला परत केली जाईल.

    follow whatsapp