Personal Finance Loan on Mutual Fund: मुंबई: जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली आणि बँक कर्जासाठी वेळ लागला, तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे की, तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर देखील कर्ज (LAMF) घेऊ शकता. यामध्ये, तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा तुमचे SIP गुंतवणूक तोडण्याची देखील गरज नाही. व्याजदर सामान्यतः वैयक्तिक कर्जांपेक्षा कमी असतो, कारण ते एक सुरक्षित कर्ज आहे.
ADVERTISEMENT
नेमकं कसं मिळतं कर्ज?
जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता तेव्हा ते एका मालमत्तेसारखे असते. तुम्ही बँक किंवा नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून (NBFCs) ती मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. याला लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड (LAMF) म्हणतात. ही सुविधा डिमॅट स्वरूपात ठेवलेल्या निधीवर उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला तुमचे म्युच्युअल फंड युनिट्स कर्जदात्याकडे गहाण (Pledge) ठेवावे लागतात.
किती कर्ज घेता येईल?
कर्जाची रक्कम तुमच्या गुंतवणुकीच्या मूल्यावर अवलंबून असते. डेट म्युच्युअल फंडांवर तुम्हाला 80 ते 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकतं. इक्विटी म्युच्युअल फंडांवर ही मर्यादा 50 ते 60 टक्के आहे.
- जलद मंजुरी आणि प्रक्रिया
- गुंतवणूक न मोडता कर्ज उपलब्ध
- व्याजदर वैयक्तिक कर्जापेक्षा कमी
वैयक्तिक कर्जापेक्षा (Personal Loan) किती वेगळं आहे हे कर्ज?
वैयक्तिक कर्ज (Personal Loan)हे एक असुरक्षित कर्ज आहेय म्हणजेच तुम्हाला त्यात कोणतीही सुरक्षा (गहाणखत) देण्याची आवश्यकता नाही. बँका किंवा कर्ज कंपन्या तुमच्या उत्पन्नाच्या आणि क्रेडिट स्कोअरच्या आधारावर ते कर्ज पुरवतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल (300-550) तर व्याजदर जास्त असतो. जर स्कोअर चांगला असेल (750 च्या वर) तर व्याजदर कमी असतो. म्युच्युअल फंडावरील कर्ज हे एक सुरक्षित कर्ज असते, कारण यामध्ये तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड युनिट्स गहाण ठेवता. यामुळे, क्रेडिट स्कोअर विशेष भूमिका बजावत नाही.
ADVERTISEMENT
