Personal Finance Tips for UPI Payment: जर तुम्ही युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 15 सप्टेंबरपासून काही कॅटेगरीसाठी UPI व्यवहार मर्यादा वाढवली आहे. आता काही पेमेंटमध्ये तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त पैसे पाठवू शकाल.
ADVERTISEMENT
कोणत्या कॅटेगरीमध्ये वाढवली मर्यादा?
भांडवली बाजार, विमा, सरकारी ई-मार्केटप्लेस, प्रवास, क्रेडिट कार्ड बिल पेमेंट, व्यवसाय/व्यापारी पेमेंट, कलेक्श - या सर्वांसाठी मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे.
दागिने खरेदी आणि डिजिटल खाते उघडणे (प्रारंभिक निधी) - या सर्वांसाठी मर्यादा 2 लाख रुपये असेल.
टर्म डिपॉझिट डिजिटल अकाउंट उघडणे आणि एफएक्स रिटेल (BBPS प्लॅटफॉर्म) - या कॅटेगरीमध्ये देखील 5 लाख मर्यादा रुपये असेल.
कोणाला होईल फायदा?
आता जर तुम्हाला UPI द्वारे मोठे क्रेडिट कार्ड बिल भरायचे असेल, विमा प्रीमियम भरायचा असेल किंवा सरकारी ई-मार्केटप्लेसमधून खरेदी करायची असेल, तर तुम्हाला वारंवार पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. एकाच वेळी 5 लाख रुपयांपर्यंत ट्रान्सफर करता येईल. दागिने खरेदी करणाऱ्या आणि डिजिटल अकाउंट उघडणाऱ्या ग्राहकांना एकाच वेळी अधिक पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देखील मिळेल.
बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
NPCI ने स्पष्ट केले आहे की, मर्यादा वाढवण्याचा फायदा फक्त व्हेरिफाइड व्यापाऱ्यांनाच मिळेल. बँकांना हे सुनिश्चित करावे लागेल की, ही नवीन मर्यादा फक्त NPCI च्या नियमांचे पालन करणाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. पण, जर बँकांना हवे असेल तर ते त्यांच्या धोरणानुसार स्वतंत्र अंतर्गत मर्यादा देखील ठेवू शकतात.
15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
सर्व पेमेंट Apps आणि सेवा प्रदात्यांना 15 सप्टेंबर 2025 पर्यंत हा बदल लागू करावा लागेल. त्यानंतर, UPI द्वारे मोठ्या प्रमाणात रक्कम सहजपणे पाठवता येईल.
UPI म्हणजे काय?
UPI ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या बँक खात्यातून कोणालाही थेट पैसे पाठवू शकता किंवा त्यांच्याकडून पैसे मागू शकता, तेही 24x7 आणि लगेच. या सिस्टममध्ये, प्रत्येक यूजरकडे एक UPI आयडी (उदा. abc@upi), ईमेल अॅड्रेस सारखा असतो. तुम्ही फक्त मोबाइल नंबर किंवा UPI आयडी किंवा QR कोड स्कॅन करून पैसे पाठवू शकता. या सिस्टममध्ये IFSC कोड किंवा खाते क्रमांक लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. व्यवहारासाठी तुम्हाला फक्त एक पिन (UPI PIN) टाकावा लागेल.
ADVERTISEMENT
