Personal Finance Tips for UPI New Rules: ऑटोरिक्षासाठी पैसे भरणे असो, हातगाडीवरून फळं किंवा भाज्या खरेदी करणे असो, पाणीपुरी खाणे असो किंवा मोठ्या मॉलमध्ये खरेदी करणे असो, लोक आता कॅशऐवजी सर्रासपणे UPI पेमेंटचा वापर करतात. UPI संपूर्ण महिन्यात किती खर्च झाला हे देखील सांगते. सर्व खर्चाची नोंद ठेवण्यासोबतच, ते काही सेकंदात पैशांचं आदान-प्रदान देखील करतं.
ADVERTISEMENT
अलिकडच्या काळात, पीक अवर्समध्ये वाढलेल्या लोडमुळे UPI सिस्टम अनेक वेळा क्रॅश झाल्या आहेत. PWC या कन्सल्टन्सी कंपनीच्या अहवालानुसार, संबंधित पार्टींना 1000 रुपयांच्या व्यवहारावर 2.5 रुपये खर्च करावे लागतात. हे पैसे यूजर्सकडून वसूल केले जात नाहीत. म्हणजेच, यूजर्स वाढले असले तरी यूपीआयशी संबंधी पायाभूत सुविधा मात्र वाढलेल्या नाहीत. त्यामुळे खर्चाची भरपाई केली जात नाहीए.
पेमेंट सुधारण्यासाठी केलेले बदल
UPI सुधारण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. ट्रान्झेक्शन जलद होण्यासाठी ट्रान्झेक्शनच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हा बदल 16 जूनपासून लागू करण्यात आला आहे. आता 31 जुलैपासून आणखी काही बदल लागू केले जातील.
पर्सनल फायनान्सच्या (Personal Finance) या सीरीजमध्ये, आशिषच्या कथेतून हा संपूर्ण बदल समजून घेऊया. आशिष दररोज किमान 15 वेळा त्याचा बँक बॅलन्स तपासतो. कधी GPay द्वारे, कधी PhonePe द्वारे. आता त्याला त्याची ही सवय बदलावी लागेल. कारण देशातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल पेमेंट सिस्टम UPI आता अधिक जलद, स्मार्ट आणि मर्यादित होणार आहे.
16 जून 2025 पासून मोठा बदल करण्यात आला लागू
- आता GPay, PhonePe, Paytm सारख्या अॅप्सवरील ट्रान्झेक्शनचा प्रतिसाद वेळ (Transaction Response Time) फक्त 10 सेकंदांचा असेल (पूर्वी 30 सेकंद लागत होते).
- ‘पे’ किंवा ‘कलेक्ट’ ऑपरेशन्स आता 15 ऐवजी 10 सेकंदात प्रमाणित होतील.
- ‘ट्रान्झेक्शन रिव्हर्सल’ म्हणजेच चुकीचे पेमेंट परत घेण्याची प्रक्रिया देखील आता सुपरफास्ट होईल.
- म्हणजेच, पेमेंट, रिफंड आणि कन्फर्मेशन आता अधिक सुलभ होतील. यामुळे केवळ यूजर्सचा फायदाच होणार नाही तर सर्व्हरवरील भार देखील कमी होईल.
या मर्यादा 31 जुलैपासून लागू होतील (Day-wise)
- NPCI ने काही कामांसाठी दररोज मर्यादा निश्चित केली आहे.
- सेवा मर्यादा (दैनिक)
- बॅलन्स चेक 50 वेळापेक्षा जास्त नाही
- 25 वेळा खाते यादी पाहणे
- ऑटो पे पेमेंट: 1 प्रयत्न + 3 पुन्हा प्रयत्न (पीक टाइमच्या बाहेर)
पीक टाइम (Peak Hours)
- सकाळी 10.00 ते दुपारी 1.00
- सायंकाळी 5.00 ते रात्री 9.30
बँका आणि अॅप्सना 31 जुलै 2025 पर्यंत हे नवीन नियम लागू करणे आवश्यक आहे.
ADVERTISEMENT
