Personal Finance tips Salary Money Management: आजच्या काळात एकाच पगारावर घरखर्च, Home Loan EMI, SIP, Insurance आणि Emergency Fund सांभाळणं आव्हानात्मक आहे. मात्र योग्य आर्थिक नियोजन केल्यास हे नक्कीच शक्य आहे. त्यासाठी खालील 5 महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा.
ADVERTISEMENT
1. EMI पगाराच्या 30-35% पेक्षा जास्त नको
Home Loan घेताना बँक किती कर्ज देते यापेक्षा तुम्ही आरामात किती EMI भरू शकता हे महत्त्वाचं आहे. साधारणपणे Take-home Salary च्या 30-35% पर्यंत EMI ठेवणं तुलनेने सुरक्षित मानलं जातं.
उदाहरणार्थ, 50000 हजार रुपये पगार असल्यास EMI साधारण 15,000 ते 17,500 रूपयांच्या आसपास ठेवण्याचा विचार करता येईल. इतर कर्जं असल्यास ही मर्यादा आणखी कमी ठेवणं योग्य ठरू शकतं.
2. Emergency Fund आधी मजबूत करा
नोकरी जाणं, अचानक वैद्यकीय खर्च किंवा कुटुंबातील इतर आर्थिक अडचणी आल्यास EMI मात्र सुरूच राहते. त्यामुळे किमान 3 ते 6 महिन्यांच्या आवश्यक खर्चाइतका Emergency Fund तयार करण्याचं लक्ष्य ठेवा.
समजा, तुमचा आवश्यक मासिक खर्च 30,000 हजार रूपये आहे, तर Emergency Fund 90000 ते 1 लाख 8 हजार रुपये असू शकतो. हा पैसा सहज उपलब्ध आणि तुलनेने सुरक्षित ठिकाणी ठेवणं महत्त्वाचं आहे.
3. SIP छोटी असली तरी सुरू ठेवा
Home Loan सुरू झाल्यानंतर अनेकजण SIP बंद करतात. त्याऐवजी उत्पन्नानुसार छोटी SIP सुरू ठेवणं अधिक चांगलं.
उदाहरणार्थ, 50000 हजार पगार असल्यास सुरुवातीला 2000 ते 3000 SIP करता येऊ शकते. पगार वाढल्यावर दरवर्षी SIP मध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करा. यामुळे Home Loan सोबत दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू राहते.
4. पगार वाढला की खर्च नाही, गुंतवणूक वाढवा
पगार 50000 वरून 60000 झाला तर संपूर्ण 10000 अतिरिक्त रक्कम Lifestyle खर्चावर उधळण्याऐवजी त्यातील काही भाग SIP, Emergency Fund किंवा Home Loan Prepaymentसाठी वापरा.
उत्पन्न वाढताना गुंतवणूकही वाढली तर भविष्यातील आर्थिक उद्दिष्टं लवकर पूर्ण होण्यास मदत होते.
5. घराच्या किमतीचा बजेटशी मेळ बसवा
एकाच पगारावर घर घेताना सर्वात मोठी चूक म्हणजे जास्तीत जास्त Home Loan घेणं. बँक तुम्हाला जेवढं कर्ज देऊ शकते तेवढं घेणं आवश्यक नाही.
घर घेतल्यानंतरही EMI, घरखर्च, Insurance, Emergency Fund आणि SIPसाठी पैसे उरले पाहिजेत. त्यामुळे गरज पडल्यास कमी किमतीचं घर, मोठा Down Payment किंवा थोडं उशिरा घर घेण्याचा पर्याय विचारात घ्या.
थोडक्यात, आर्थिक नियोजन करताना आपण EMI नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. याशिवाय Emergency Fund तयार करा आणि SIP बंद करू नका. तसंच पगार वाढल्यावर गुंतवणूक वाढवा आणि घराची किंमत आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेतच ठेवा.
ADVERTISEMENT












