ग्राहकांना दिलासा! युद्धाच्या भडक्यात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण... काय आहे सध्याचा दर?

गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या इराण युद्धामुळे संपूर्ण जग हादरून गेलं आहे. देशांमधील या संघर्षाच्या काळात सोने आणि चांदीचे भाव घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी मार्केट (MCX) मध्ये सोने आणि चांदीचे भाव घसरल्याचं वृत्त समोर आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण...

सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण...

मुंबई तक

05 Mar 2026 (अपडेटेड: 05 Mar 2026, 05:05 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

युद्धाच्या भडक्यात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण...

point

काय आहे सध्याचा दर?

Gold Silver Price: गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या इराण युद्धामुळे संपूर्ण जग हादरून गेलं आहे. देशांमधील या संघर्षामुळे मध्य पूर्वेतील तणावात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळेच, गल्फ कंट्रीकडून युरोप आणि आशियातील देशांना होणारा ऊर्जा पुरवठा खंडित झाला आहे. या काळात, कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत, प्रति बॅरल 85 डॉलर पर्यंत पोहोचल्या आहेत आणि पुढे त्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. याउलट, सोने आणि चांदीचे भाव घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी मार्केट (MCX) मध्ये सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत. 

हे वाचलं का?

सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण

गुरुवारी, एप्रिलच्या मुदतीसाठी सोन्याच्या किमती 1000 रुपयांनी घसरून 1 लाख 60 हजार रुपयांवर आल्या. त्याचप्रमाणे चांदीच्या किमतीही घसरल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, मार्चच्या मार्चच्या मुदतीसाठी 1 किलो चांदीची किंमत 7,500 रुपयांनी घसरून 2.58 लाख रुपयांवर आली. मात्र, आता या किमतीत काही प्रमाणात रिकव्हरी पाहायला मिळत आहे. 

एक्स्पर्ट्सचं मत 

एक्स्पर्ट्सच्या माहितीनुसार, युद्धाच्या पूर्वी सोने आणि चांदीच्या किमती झपाट्याने वाढल्या होत्या. तसेच, युद्धादरम्यान या मालमत्तेत वाढ झाली होती, परंतु आता गुंतवणूकदार यातूनही नफा कमवत आहेत. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमती अस्थिर आहेत. चांदीची स्पॉट किंमत 85 डॉलर वरून 83 डॉलरवर घसरली आहे. 3 मार्चच्या उसळीनंतर ती 15 टक्क्यांनी घसरली. मात्र, सध्या ती रिकव्हरी मोडमध्ये आहे. त्याचप्रमाणे, सोन्याच्या किमती 5,626.80 डॉलरवरून 5,200 डॉलरवर घसरल्या आहेत. 

हे ही वाचा: भारतातून इराणला परतत असलेली युद्धनौका श्रीलंकेत पोहोचताच अमेरिकेचा हल्ला, 87 जणांचा मृत्यू

युद्धापूर्वी, सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. एमसीएक्सवर सोने 1.93 लाख रुपये या विक्रमी उच्चांकावर पोहोचले, तर चांदी 4.20 लाख रुपये या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. परिणामी, सोने आता त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा 33,000 रुपयांनी स्वस्त म्हणजेच 1.60 लाख रुपये झाले आहे आणि चांदी 1.62 लाख रुपये स्वस्त झाली आहे.

सोने आणि चांदीच्या किमतीत घट होण्यासोबतच सोन्या-चांदीच्या ईटीएफच्या किमतीही घसरल्या आहेत. बुधवारी सोने ईटीएफ 4 टक्क्यांनी घसरलं, तर चांदीच्या ईटीएफ 8 टक्क्यांनी घसरलं. गुरुवारी सोने ईटीएफ 2 टक्क्यांनी आणि चांदीच्या ईटीएफ 4 टक्क्यांनी घसरलं. 

    follow whatsapp