10 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार, निर्जनस्थळी नेलं अन्... मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबईतील चुनाभट्टी येथे एका 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर तिघांनी मिळून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रकरणातील आरोपी सुद्धा अल्पवयीन असून त्यातील दोघे तर 18 वर्षांखालील असल्याची माहिती मिळाली आहे.

10 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार, निर्जनस्थळी नेलं अन्...

10 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार, निर्जनस्थळी नेलं अन्...(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई तक

22 Jul 2025 (अपडेटेड: 23 Jul 2025, 01:44 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

10 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

point

निर्जनस्थळी नेऊन तिघांकडून अत्याचार

Mumbai Crime: मुंबईत एका 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर तिघांनी मिळून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रकरणातील आरोपी सुद्धा अल्पवयीन असून त्यातील दोघे तर 18 वर्षांखालील असल्याची माहिती मिळाली आहे. पीडित मुलाच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबद्दल तक्रार नोंदवली असून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चुनाभट्टी परिसरात ही संतापजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका 10 वर्षांच्या चिमुकल्यावर तिघांनी मिळून अत्याचार केला. तसेच पीडित मुलगा आणि तीन आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असल्याचं सांगितलं जात आहे. मुलाला फसवून तिघांनी चुनाभट्टी येथे एका निर्जनस्थळी नेलं आणि तिथे त्याच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार करण्यात आला.  

हे ही वाचा: अनैतिक संबंधाच्या आड येत होता पती, प्रियकराच्या साथीने संपवलं अन् घरातंच पुरून...

आईने विचारलं असता सगळं सांगितलं 

या सगळ्या प्रकारानंतर पीडित मुलगा घरी आला. त्यावेळी तो अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होता. मुलाला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर आईला चिंता वाटली. त्यामुळे आईने मुलाला विश्वासात घेऊन नेमकं काय घडलंय याबद्दल त्याला विचारलं. आईने विचारणा केली असता पीडित मुलाने घाबरत घाबरत आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल तिला सगळं सांगितलं. मुलाकडून हे सगळं ऐकल्यानंतर आईला मोठा धक्का बसला. त्यानंतर तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तीन आरोपी मुलांविरोधात तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा: बीड: रात्री लघुशंकेसाठी उठली अन् ओढून खोलीत नेलं, सख्ख्या मामानेच भाचीसोबत...

पोलिसांकडून अल्पवयीन आरोपींना अटक 

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असून त्या अल्पवयीन मुलांची शनिवारी डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर एका 18 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 137(2), 115(2) आणि 3(5) सह पोक्सो कायदा कलम 6 आणि 10 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


 

    follow whatsapp