Maharashtra Weather : राज्यातील हवामान विभागाने 22 जुलै रोजी मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट जारी केली आहे. भारतीय हवमानशास्त्राच्या (IMD) नुसार हवमानात बदल निर्माण होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. यासाठी आपण (www.imdpune.gov.in) (www.imdpune.gov.in) या संकेतस्थळांचाही उपयोग करू शकता. जेणेकरून अचूक माहिती मिळवता येईल. दरम्यान, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनच्या परिस्थितीबाबत मोठी अपडेट जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
हेही वाचा : कर्माचं फळ! भाजप नेते प्रफुल्ल लोढांना हनी ट्रॅप प्रकरणात अटक, तरुणींचे अश्लील फोटो बनवल्याचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
कोकण
कोकणातील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पावसाची क्षमात असणार आहे. पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गा जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर समुद्रकिनारी लाटा उसळण्याची शक्यता आहे. यासाठी हवामान विभागाने मच्छिमारांना हवामान विभागाने सावदानतेचा इशारा दिला आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि अहमदनगरचा समावेश आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा मान्सून दाखल होणार आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोराचा पाऊस कोसळेल. पुणे आणि साताऱ्यात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. पण मुसळधार पाऊस नसेल. शेतकऱ्यांनी पेरणी आणि इतर शेतीसाठी कामांसाठी हवामानाचा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणीत तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती लक्षात घेऊनच पिकांचे नियोजन करावं.
हेही वाचा : कर्माचं फळ! भाजप नेते प्रफुल्ल लोढांना हनी ट्रॅप प्रकरणात अटक, तरुणींचे अश्लील फोटो बनवल्याचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ
विदर्भात बहुतांश ठिकाणी शक्यता मध्यम ते जोराचा मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. आणि तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूरमध्ये विषेशत: मान्सून दाखल होईल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे.
ADVERTISEMENT
