Crime News: उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमधून सर्वांनाच चकित करणारी बातमी समोर आली आहे. 20 वर्षांचा संसार आणि 4 मुलं असून देखील एक महिला पती आणि मुलांना सोडून आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT
16 वर्षे लहान तरुणावर प्रेम...
उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरचा रहिवासी रामचरण प्रजापतीचं जानकी देवीसोबत 20 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर त्यांना 4 मुलं झाली. त्यानंतर पैसे कमवण्यासाठी रामचरण मुंबईत आला. मात्र, त्याच्या पत्नीचे गावात भलतेच कारनामे सुरू होते. खरंतर, त्यांच्या गावात राहणारा सोनू उर्फ परशुराम नावाचा तरुण रामचरणच्या घरी सतत येत जात होता. यादरम्यान, जानकी देवी आणि परशुराममध्ये बोलणं सुरू झालं. मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम हा जानकीपेक्षा 16 वर्षांनी लहान आहे.
हे ही वाचा: अनैतिक संबंधाच्या आड येत होता पती, प्रियकराच्या साथीने संपवलं अन् घरातंच पुरून...
दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि मैत्रीच्या नात्याचं प्रेमात रूपांतर झालं. मात्र, तरुणावरच्या प्रेमामुळे महिलेने आपल्या पतीलाच धोका दिला आणि आपल्या 4 मुलांना देखील सोडून दिलं. संबंधित महिलेचं वय 40 वर्षे आणि तिच्या प्रियकराचं वय 24 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे.
दोघांमध्ये प्रेमसंबंध आणि पतीला दिला धोका
या काळात जानकी आणि परशुराममध्ये प्रेमसंबंध बनले. पत्नीचे गावातील तरुणासोबत संबंध असल्याचं कळताच पती लगेच गावी निघून आला. त्याने आपल्या पत्नीच्या वागण्याला विरोध केला आणि तिला सगळं करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्या दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. जवळपास 1 वर्षांपूर्वी जानकी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र, काही महिन्यांनी ती परत आली आणि तिने रामचरणची माफी मागितली. त्यावेळी पतीने माफ करून तिला पुन्हा घरात घेतलं.
हे ही वाचा: अनैतिक संबंधाच्या आड येत होता पती, प्रियकराच्या साथीने संपवलं अन् घरातंच पुरून...
प्रियकरासोबत कोर्ट मॅरेज अन् मुलांना सुद्धा सोडलं
मात्र, काही महिन्यांनंतर जानकी पुन्हा त्याच प्रियकरासोबत पळून गेली आणि यावेळी रामचरणच्या मनात वेगळीच भिती होती. जानकी आणि तिचा प्रियकर आपल्याला मारून तर टाकणार नाहीत ना? असा विचार करून रामचरण पोलीस स्टेशनमध्ये गेला. खरंतर, महिलेने तिच्या प्रियकरासोबत आधीच कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यामुळे रामचरणने जानकीला तिच्या प्रियकरासोबत पाठवलं. दरम्यान, आता मुलांची देखील काळजी वाटत नसल्याचं जानकीने स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे त्यांची चार मुलं रामचरणसोबतच राहतील.
ADVERTISEMENT
