Crime News : बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना समोर आली असून, परीक्षा देऊन घरी परतत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रिक्षा चालकाला अटक केली असून, न्यायालयात हजर करून त्याला कारागृहात पाठवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
ही घटना मखदुमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी जहानाबाद येथे गेली होती. परीक्षा आटोपल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ती ट्रेनने मखदुमपूर रेल्वे स्थानकावर उतरली. घर गाठण्यासाठी उशीर होत असल्याने तिने स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या एका ऑटोमधून घरी जाण्याचा निर्णय घेतला.
ऑटोचालकाने विद्यार्थिनीला घेऊन प्रवास सुरू केला. मात्र काही अंतर गेल्यानंतर त्याने अचानक मार्ग बदलत ऑटो चुकीच्या दिशेने नेला. पुढे एका निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याने ऑटो थांबवला आणि विद्यार्थिनीवर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. पीडिता जोरजोरात मदतीसाठी ओरडत होती, मात्र परिसर ओसाड असल्याने तिचा आवाज कोणालाही ऐकू गेला नाही. अत्याचारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित विद्यार्थिनी कसाबसा घरी पोहोचली. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. मुलीची अवस्था पाहून कुटुंबीय हादरले आणि तात्काळ तिला घेऊन मखदुमपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथे पीडितेने रडत रडत ऑटोचालकाने केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांना दिली.
पीडितेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पीडितेने सांगितलेल्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली. तपासादरम्यान ऑटोचालकाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर काही वेळातच आरोपीला अटक करण्यात आली.
मखदुमपूर पोलीस ठाण्याचे ठाणेअंमलदार दिवाकर कुमार विश्वकर्मा यांनी सांगितले की, पीडितेचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली. आरोपीची ओळख मखदुमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमपूरा गावातील छोटू अशी झाली आहे. आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याला न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, पीडितेला सर्वतोपरी कायदेशीर मदत देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर : वनतारात नेलेल्या माधुरी हत्तीणीला नांदणीत आणण्याचा मार्ग मोकळा, मुंबईत मोठ्या घडामोडी
ADVERTISEMENT











