Mumbai Train Blast Case : मुंबईत 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील 11आरोपींची निर्दोष म्हणून सुटका करण्यात आलेली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एच चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल 21 जुलै रोजी जारी केला आहे. तत्कालीन परिस्थिती पाहता, 209 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तसेच 800 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : "जा मराठी बोलणार नाही हा हिंदुस्तान...", परप्रांतिय महिला दुकानदाराची मराठी ग्राहकांवर मुजोरी
दरम्यान, मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटात 11 आरोपींची निर्दोष म्हणून सुटका करण्यात आल्याने तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तेव्हा 11 मिनिटांमध्ये सात ठिकाणी स्फोट झाले होते. हा स्फोट चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान घडवण्यात आला होता. हा बॉम्बस्फोट घडवण्यासाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात आला होता. पोलिसांना संबंधित प्रकरणात योग्य ते पुरावे न सापडल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
पाच जणांना फाशी
याच प्रकरणात दोषींना 2015 मध्ये न्यायालयाने 12 आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि त्यानंतर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आरोपी दोषींनी पोलिसांनी मारहाण करून जबाब नोंदवण्यास भाग पाडल्याचा आरोप आरोपींनी केला आहे. यानंतर आता त्यांची निर्दोष म्हणून सुटका करण्यात आली आहे.
हेही वाचा : मंगळ ग्रह दीड वर्षानंतर राशी बदलणार, 'या' राशीतील लोक मालामाल होणार, तुमची कोणती राशी?
तब्बल 19 वर्षानंतर निकालाची सुनावणी
दरम्यान, या प्रकरणात 12 पैकी 11 आरोपींनी येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली. त्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर आनंद त्यांचा गगणाच मावेनासा झाला होता. तब्बल 19 वर्षानंतर या निकालाची सुनावणी झाली आहे. यातील पाच जणांना फाशीची शिक्षा झाली होती. तर मुंबई उच्च न्यायालयाने 11 आरोपींची निर्दोष म्हणून सुटका करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
