मुंबईतील रिटायर्ड ऑफिसरकडून तब्बल 71 लाख रुपये लुबाडले! अंडरवर्ल्ड डॉनसोबत कनेक्शन असल्याचा आरोप अन्...

एका निवृत्त अधिकाऱ्याची 71 लाख रुपयांहून अधिक पैशांसाठी फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने मुंबई पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे.

रिटायर्ड ऑफिसरकडून तब्बल 71 लाख रुपये लुबाडले!

रिटायर्ड ऑफिसरकडून तब्बल 71 लाख रुपये लुबाडले!

मुंबई तक

• 09:00 AM • 03 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील रिटायर्ड ऑफिसरकडून तब्बल 71 लाख रुपये लुबाडले!

point

अंडरवर्ल्ड डॉनसोबत कनेक्शन असल्याचा आरोप अन्...

Mumbai Crime: एका निवृत्त अधिकाऱ्याची 71 लाख रुपयांहून अधिक पैशांसाठी फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने मुंबई पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेमचं नाव घेऊन एका रिटायर्ड ऑफिसरची 71 लाख रुपयांची फसवणूक केली. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्या आरोपींनी स्वतःची नाशिकचे पोलीस अधिकारी म्हणून ओळख सांगितली. त्यांनी हळूहळू पीडित निवृत्त अधिकाऱ्याचा विश्वास संपादन केला आणि नंतर संपूर्ण रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतली.

हे वाचलं का?

व्हिडीओ कॉलवरून धमकी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 23 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान पीडित अधिकाऱ्याला बरेच फोन कॉल केले. त्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल सुद्धा केले. नाशिकचे पोलीस अधिकारी असल्याचं भासवून, फसवणूक करणाऱ्या आरोपींनी संबंधित रिटायर्ड ऑफिसरच्या बँक खात्यात काही संशयास्पद पैसे आले असून त्याचं कनेक्शन अबू सलेमशी असल्याचं निवृत्त अधिकाऱ्याला सांगितलं.

तसेच, हे पैसे स्टॉक फ्रॉड आणि खंडणीशी संबंधित असल्याचा आरोपींनी दावा केला. त्यांनी मुंबई पोलिसांच्या 10 मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एकावर गुन्हा दाखल झाल्याचा दावा करण्याची धमकी सुद्धा दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी पीडित अधिकाऱ्याला धमकावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने बनावट अटकेचे आदेश सुद्धा पाठवले. त्यांनी त्या रिटायर्ड ऑफिसरला 10 वॉन्टेड गुन्हेगारांच्या फोटोंसह एक पत्र पाठवलं.

हे ही वाचा: मुंबईची खबर: प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई रेल विकास महामंडळाचं मोठं पाऊल! आता ट्रेस्पासिंगमुळे जीव गमवावा लागणार नाही...

71 लाख 24 हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर... 

आरोपींनी दावा केला की पीडित अधिकाऱ्याच्या खात्यात जमा झालेल्या पैशांपैकी अबू सालेमचा वाटा (10 टक्के) कमिशन होता. जर त्यांनी पोलिस तपासात सहकार्य केलं नाही तर त्यांना सुद्धा अंडरवर्ल्ड कनेक्शनच्या प्रकरणात अडकवलं जाईल. या धमकीमुळे आणि खोट्या, बनावट कागदपत्रांमुळे घाबरून पीडित निवृत्त अधिकाऱ्याने आरोपीच्या म्हणण्यानुसार 71 लाख 24 हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.

हे ही वाचा: हॉटेलच्या छतावरून नग्न अवस्थेत खाली पडली तरुणी... पोलिसांनी ‘त्या’ खोलीत पोहोचताच पाहिलं धक्कादायक दृश्य!

फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, निवृत्त अधिकाऱ्याने तातडीने सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला असून यासंबंधी तपास सुरू केल्याची माहिती आहे.

    follow whatsapp