Weather update : राज्यात किमान सरासरीच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात अधिक तापमान राहिल असा हवामान विभागाने इशारा दिला आहे. परिणामी राज्यात नोव्हेंबर महिन्यात थंडावा कमी जाणवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान हे सरसरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. अशातच आता राज्यातील संपूर्ण देशात नोव्हेंबर महिन्यात अधिक पावसाचा अंदाज जारी केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रावसाहेब दानवे यांच्या नातवावर 10 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, भाजप पदाधिकाऱ्यांकडून नाशकात तक्रार दाखल
देशभरातील काही भागांमध्ये किमान तापमान सरसरीपेक्षा अधिक
तसेच नोव्हेंबर महिन्यातील किमान आणि कमाल तापमानाचा अंदाज वर्तवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी नोव्हेंबर महिन्यात वायव्य भारताचा काही भाग वगळता देशभरातील काही भागांमध्ये किमान तापमान सरसरीपेक्षा अधिक राहिल अशी शक्यता वर्तवली आहे.
थंडीचं वातावरण नसेल असा हवामान विभागाचा अंदाज
दरम्यान, देशातून राज्यातच सर्वाधिक पावसाची नोंद असते, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. याच कालावधीत दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अधिक पावसाची शक्यता आहे. यंदा या भागांमध्ये 123 टक्के पाऊस म्हणजेच सरासरीइतका आहे. राज्यात किमान तापमानाची शक्यता असल्याने वातावरणात थंडावा नसेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे.
हे ही वाचा : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात भीषण अपघात, नियंत्रण सुटलं अन् दोन्ही भावांवर काळाचा घाला, CCTV फुटेज व्हायरल
मुंबईत पावसाची रिपरिप
तसेच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधारा सुरु आहे. दिवसभरात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तर सायंकाळी पावसाची शक्यता दिसून येते. दरम्यान, शनिवारी पहाटेपासून शहराच्या उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांची धांदल उडालेली दिसून आली.
ADVERTISEMENT











