Ex CJI NV Raman , अमरावती : माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या कुटुंबीयांविरोधात खटले दाखल करण्यात आले, असे माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी म्हटले आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. एन. व्ही. रमण यांनी तत्कालीन वायएसआरसीपी सरकारचे नाव न घेता न्यायव्यवस्थेतील सदस्यांवर दबाव आणि छळ झाल्याचे सांगितले.
ADVERTISEMENT
"शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सहानुभूती दाखवणाऱ्या सर्वांना धमक्या देण्यात आल्या"
एन. व्ही. रमण यांनी पुढे बोलताना सांगितले की, “इथे उपस्थित असलेल्या बहुतेकांना ठाऊक आहे की, माझ्या कुटुंबातील सदस्यांना कसे लक्ष्य करण्यात आले आणि त्यांच्या विरोधात फौजदारी खटले दाखल करण्यात आले. हे सर्व फक्त माझ्यावर दबाव आणण्यासाठीच करण्यात आले होते. मी एकटाच अशा परिस्थितीत नव्हतो. त्या कठीण काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सहानुभूती दाखवणाऱ्या सर्वांना धमक्या देण्यात आल्या. त्यांच्यावर दबाव देखील टाकण्यात आला.”
हेही वाचा : रावसाहेब दानवे यांच्या नातवावर 10 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, भाजप पदाधिकाऱ्यांकडून नाशकात तक्रार दाखल
दरम्यान, दबाव आणि छळाचा दाखला देत असताना ते तत्कालीन वाय. एस. जगन मोहन रेड्डी सरकारविरुद्धच्या शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत होते. माजी सरन्यायाधीश पुढे म्हणाले की,“त्या वेळी अनेक राजकीय नेते आपली भूमिका घेण्यास कचरत होते किंवा मौन बाळगत होते. मात्र या देशातील न्यायतज्ज्ञ, वकील आणि न्यायालयांनी आपल्या घटनात्मक शपथेप्रती निष्ठा जपत ठामपणे उभे राहिले.”
“अमरावतीच्या शेतकऱ्यांच्या धैर्याला सलाम” — रमण
रमण म्हणाले, “सरकारे येतात-जातात, पण न्यायव्यवस्था आणि कायद्याचे राज्य हे स्थैर्याचे प्रतीक राहतात. कायद्याचे राज्य तेव्हाच जिवंत राहते, जेव्हा लोक प्रामाणिक राहतात आणि केवळ सोयीसाठी प्रामाणिकपणा सोडत नाहीत. मी अमरावतीच्या शेतकऱ्यांच्या धैर्याला सलाम करतो, ज्यांनी सरकारच्या शक्तीसमोर न झुकता संघर्ष केला. त्यांच्या या लढ्याने मला मोठी प्रेरणा दिली आहे. न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवणाऱ्या त्या शेतकऱ्यांचे मी आभार मानतो.”
इतर महत्त्वाच्या बातम्या
21 वर्षाच्या पोरीची कमालच, भारतीय संघाची रणरागिणी.. ऐनवेळी गेमच फिरवणारी शेफाली आहे तरी कोण?
ADVERTISEMENT











