मुंबईतील वृद्ध जोडप्याची तब्बल 4.5 कोटी रुपयांची फसवणूक! सरकारी सील असलेल्या बनावट नोटिस अन् व्हिडीओ कॉल...

19 दिवसांत, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी "डिजिटल अरेस्ट" ची धमकी दाखवून पीडित जोडप्याकडून 4,05,80,000 रुपये लुबाडल्याची माहिती आहे.

वृद्ध जोडप्याची तब्बल 4.5 कोटी रुपयांची फसवणूक!

वृद्ध जोडप्याची तब्बल 4.5 कोटी रुपयांची फसवणूक!

मुंबई तक

• 05:16 PM • 25 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील वृद्ध जोडप्याची तब्बल 4.5 कोटी रुपयांची फसवणूक!

point

सरकारी सील असलेल्या बनावट नोटिस अन् व्हिडीओ कॉल...

Mumbai Crime: मुंबईच्या गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याची मोठी फसवणूक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. केवळ 19 दिवसांत, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी "डिजिटल अरेस्ट" ची धमकी दाखवून पीडित जोडप्याकडून 4,05,80,000 रुपये लुबाडल्याची माहिती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, पोलीस, सीबीआय आणि इतर सरकारी एजन्सींचे अधिकारी असल्याचं भासवून त्यांची फसवणूक केली आणि इतकेच नव्हे तर, सरकारी सील असलेल्या बनावट नोटिसद्वारे आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी पीडित जोडप्याची कोटी रुपयांची फसवणूक केली. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

27 ऑक्टोबर रोजी, मुंबई सायबर पोलिसांना नोकरीतून रिटायर्ड झालेल्या एका वृद्ध व्यक्तीचा फोन आला. त्या वृद्ध व्यक्तीने त्याला दूरसंचार विभागातील कार्यकरी असल्याचा दावा करणाऱ्या एका तरुणाचा फोन आल्याचं सांगितलं. फोन करणाऱ्या तरुणाने पीडित वृद्धाचे डॉक्यूमेंट्स आणि बँक खाते मनी लाँड्रिंग प्रकरणात वापरले जात असल्याचा दावा केला. त्यामुळे, पीडित व्यक्ती घाबरली आणि काही तासांनंतर, त्याला मुंबई गुन्हे शाखा, दिल्ली पोलीस आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या आरोपी व्यक्तींचे व्हिडिओ कॉल आले. पीडित वृद्धाला धमकावण्यासाठी आरोपींनी सरकारी संस्थांकडून बनावट लेटरहेड, एफआयआर कॉपी, अटक वॉरंट आणि कोर्टाच्या नोटिस व्हाट्सअॅपच्या माध्यमातून पाठवल्या. या डॉक्यूमेंट्सवर सरकारी सील आणि खोट्या सह्या सुद्धा होत्या. त्यामुळे, वृद्ध जोडप्याला आरोपींचं म्हणणं पटलं. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: प्रवाशांसाठी 3 नव्या उड्डाणपुलांची निर्मिती, विमानतळाशी थेट कनेक्शन अन्... लवकरच होणार कायापालट!

4,05,80,000 रुपयांची फसवणूक 

आरोपींनी वृद्धाला आणि त्याच्या पत्नीला अटक केली जाणार असल्याचं पीडित व्यक्तीला सांगितलं. आरोपींनी वृद्धाला सांगितलं की, जर त्यांना या प्रकरणातून सुटका हवी असेल तर त्यांनी बँकेत जमा केलेले पैसे व्हेरिफिकेशनसाठी सरकारच्या सीक्रेट अकाउंटमध्ये पाठवावेत. तपासणीनंतर पैसे परत केलं जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पीडित जोडपं सर्व्हिलांसवर असून जर त्यांनी आज्ञा पाळण्यास नकार दिला तर त्यांना डिजिटल अरेस्ट केली जाणार असल्याची धमकी सुद्धा त्यांनी दिली. स्वतःला आणि आपल्या पत्नीला अटक होणार असल्याच्या भीतीने, वृद्धाने 27 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान जवळपास 4 कोटी 5 लाख 60 हजार रुपये आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.

हे ही वाचा: Govt Job: आता सरकारी बँकेत मिळवा मॅनेजर पदावर नोकरी! 'या' भरतीसाठी आत्ताच करा अर्ज...

तीन आरोपींना अटक 

जेव्हा पीडित वृद्धाकडून पैसे ट्रान्सफर केले गेले, तेव्हा कॉल करणाऱ्या आरोपींनी संपर्क बंद केला आणि त्यावेळी वृद्ध व्यक्तीला या प्रकरणाबाबत संशय आला. वृद्धाने एका जवळच्या मित्राला याबद्दल सांगितलं असता त्याची सायबर फसवणूक झाल्याचं समोर आलं. त्यानंतर त्याने गोरेगाव पोलिसांशी संपर्क साधला. टेक्निकल तपासणीनंतर, सायबर सेलने तीन आरोपींना अटक केली असून विलास गेणू मोरे उर्फ रेहान खान, रिजवान शौकत अली खान आणि कासिम रिजवान शेख अशी त्यांची नावे समोर आली आहेत. त्यांचे काम परदेशातील सायबर हँडलर्सना कमिशनवर भारतीय बँक खाती उपलब्ध करुन देणं, असं होतं. सध्या, सायबर फसवणूकीच्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

    follow whatsapp