Govt Job: आता सरकारी बँकेत मिळवा मॅनेजर पदावर नोकरी! 'या' भरतीसाठी आत्ताच करा अर्ज...
बँक ऑफ इंडिया (BOI) या मोठ्या सरकारी बँकेकडून 'मॅनेजर'च्या 115 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आता सरकारी बँकेत मिळवा मॅनेजर पदावर नोकरी!
'या' भरतीसाठी आत्ताच करा अर्ज...
Govt Job: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ इंडिया (BOI) या मोठ्या सरकारी बँकेकडून 'मॅनेजर'च्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 115 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
115 पदांसाठी भरती
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofindia.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच, या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर पदाच्या 115 जागांवर भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रोफेशनल नॉलेज आणि अनुभवाच्या आधारे केली जाणार आहे.
या भरतीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्जदारांची संख्या लक्षात घेऊन नियुक्तीसाठी टप्पे ठरवले जातील. यासाठी 125 गुणांची लेखी परीक्षा आयोजित केली जाणार आहे आणि यासाठी 100 मिनिटांचा कालावधी असेल.
हे ही वाचा: मुंबई: सूटकेसमध्ये 'त्या' अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह... डोंबिवलीतील खळबळजनक घटना!
अर्जाचं शुल्क
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना प्रवर्गानुसार, अर्जाचं शुल्क भरावं लागेल. यामध्ये एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूडी (PWD) प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 175 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. जनरल (Open) आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल.










