चंद्रपूर : शिक्षकाचे विद्यार्थीनीला बाथरुममध्ये विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल, स्क्रीनशॉट मुलीच्या वडिलांना दिसले अन्..
Chandrapur Crime : चंद्रपूर : शिक्षकाचे विद्यार्थीनीला बाथरुममध्ये विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल, स्क्रीनशॉट मुलीच्या वडिलांना दिसले अन्..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चंद्रपूर : शिक्षकाचे विद्यार्थीनीला बाथरुममध्ये विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल
स्क्रीनशॉट मुलीच्या वडिलांना दिसले अन्..
Chandrapur Crime, चंद्रपूर : नाशिकच्या मालेगावमध्ये चिमुरडीवर झालेल्या अत्याचारप्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच चंद्रपूरमध्येही एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणात शहर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक करून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटकेतील शिक्षकाचे नाव दिलीप दादाजी मडावी (वय 53) असे आहे.
पीडित मुलगी पाच वर्षांपूर्वी राजुरा पोलिस ठाण्याच्या सीमेत येणाऱ्या एका शाळेत इयत्ता सहावीपर्यंत शिक्षण घेत होती. त्याच शाळेत मडावी शिक्षक होते. मुलगी अभ्यासात हुशार असल्याने पुढील शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठवण्याचा सल्ला त्यानेच तिच्या पालकांना दिला होता. त्यानुसार मागील वर्षी मुलगी चंद्रपूरमध्ये आली आणि एका ठिकाणी राहत शिक्षण घेत होती. या काळात तिच्या आई-वडिलांकडून जेव्हा घरगुती वस्तू किंवा आवश्यक साहित्य शिक्षकाच्या माध्यमातून पाठवले जायचे, तेव्हा हा आरोपी शिक्षक त्या मुलीच्या राहत्या ठिकाणाखाली येत असे. वस्तू देण्याच्या नावाखाली तो तिला आपल्या वाहनात बसवून तिच्यावर अनुचित वर्तन करत असे, असा उघड आरोप पीडितेने पोलिसांसमोर केला. भीतीमुळे व बदनामीच्या धास्तीने मुलीने अनेक महिने हा प्रकार पालकांपासून लपवून ठेवला. अखेर 20 नोव्हेंबर रोजी हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तृप्ती खंडाईत यांनी विद्यार्थिनीचे बयान नोंदवत आरोपी दिलीप मडावीविरुद्ध बीएनएस कलम ७५(१), ६४(२), आयएमएफ ६५(१), ३५२, ४, ६, १२ तसेच पोक्सो व आयटी अॅक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
प्रकरण कसे आले उघडकीस?
पीडित मुलीवर प्रत्यक्ष अत्याचार करूनही आरोपी तिच्यावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दबाव टाकत होता. तो तिला रात्रीच्या सुमारास बाथरुममध्ये जाऊन कपडे काढून व्हिडिओ कॉल करण्याची सक्ती करत असे. एवढेच नव्हे तर त्या कॉलचे स्क्रीनशॉट तो सेव्ह करून ठेवत असे. २० नोव्हेंबर २०२५ रोजी चुकून हे स्क्रीनशॉट व चॅटिंगचे काही भाग थेट मुलीच्या वडिलांच्या फोनवर गेले. हे पाहताच ते हादरून गेले. त्यांनी मुलीची विचारपूस केली असता तिने सर्व भयावह सत्य उघड केले. त्यानंतर तत्काळ पोलिस तक्रार नोंदवण्यात आली.










