गोरख आणि सुरेश दोघां जिवलग मित्रांची आत्महत्या... घटनेनं सोलापूर हादरलं
solapur suicide : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथे एक मन सून्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन जीवलग मित्रांनी पुढचा मागचा कसलाही विचार न करता गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येचं कारण समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन जिवलग मित्रांची आत्महत्या
पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरु असतानाच दुसऱ्या मित्राची आत्महत्या
Solapur Suicide : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथे एक मन सून्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन जीवलग मित्रांनी पुढचा मागचा कसलाही विचार न करता गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येचं कारण समोर आले आहे. सुरुवातीला एका तरुणाने आत्महत्या घेत आपलं जीवन संपवलं, या घटनेची माहिती आत्महत्या केलेल्या तरुणाच्या मित्राला समजल्याने त्याने देखील टोकाचं पाऊल उचललं आहे.
हे ही वाचा : Dharmendra Passed Away : अलविदा धर्मेंद्रजी! वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दोन जिवलग मित्रांची आत्महत्या
एकाच दिवशी दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण दक्षिण सोलापूरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. गोरख तानाजी भोई आणि सुरेश भोई हे राहणार वांगी अशी आत्महत्या केलेल्या मित्रांची नावे समोर आलेली आहेत. यापैकी गोरख तानादी भोईने शुक्रवारी रात्री राहत्या घरी रात्री दहा वाजता साडीने गळफास घेत आत्महत्या केली.
पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरु असतानाच दुसऱ्या मित्राची आत्महत्या
या घटनेची माहिती समजल्यानंतर नातेवाईकांनी त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराआधीच गोरख भोईचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांना सांगितली. शनिवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याचक्षणी अंत्यविधी सुरु असताना सुरेशने शेतात गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं आहे.
त्याचक्षणी गोरख भोईच्या अचानकपणे जाण्याने त्याचा जिवलग मित्र सुरेश भोई (वय 21) याला दुःख झाले. सुरेशचे आई-वडील वांगी गावातील एका शेतकऱ्याकडे कामाला आहेत. त्याची आई-वडील हे वांगी गावातील एका शेतकऱ्याकडे रोजनदारीवर काम करतात. त्याने घरी न येतात शेतातील एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.










