आता मुलंही सुरक्षित नाहीत, वाशिममध्ये शिक्षकाचे वरच्या मजल्यावर नेत विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे
Washim Crime : आता मुलंही सुरक्षित नाहीत, वाशिममध्ये शिक्षकाचे वरच्या मजल्यावर नेत विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आता मुलंही सुरक्षित नाहीत
वाशिममध्ये शिक्षकाचे वरच्या मजल्यावर नेत विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे
कारंजा (जि. वाशिम) : शहरातील ट्युशन क्लासमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर शिक्षकाने केलेल्या अश्लील चाळ्याच्या प्रकरणाने कारंजा शहर हादरले आहे. गुरु-शिष्याच्या नात्याला कलंक ठरलेल्या या घटनेत संबंधित शिक्षकावर पोस्को (POCSO) आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 18 नोव्हेंबर रोजी दुपारच्या वेळेत घडली.
स्थानिक भागातील 11 वर्षीय विद्यार्थी नियमितपणे एका खाजगी शिकवणी वर्गाला जात होता. नेहमीप्रमाणे तो त्या दिवशी दुपारी क्लासला हजर झाला असता, आरोपी शिक्षक प्रवीण रामेश्वर व्यवहारे यांनी त्याला वरच्या मजल्यावर बोलावून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढे, तेथे शिक्षकाने मुलाशी अशोभनीय वर्तन केल्याचे उघड झाले आहे. अचानक झालेल्या या प्रसंगामुळे मुलगा घाबरून गेला. घरी परतल्यावर त्याने धैर्य एकवटत आईला संपूर्ण प्रकार सांगितला.
हेही वाचा : मासिक पाळी आल्याने आईने मुलीला दोन वर्षे अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलं, धक्कादायक प्रकाराने पोलिसही हादरले
मुलाने सांगितलेल्या घटनेनंतर पालकांनी तात्काळ कारंजा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. विद्यार्थ्याच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली आणि आरोपी शिक्षकाविरुद्ध गंभीर गुन्हे नोंदविण्याची कारवाई तातडीने सुरू केली. संबंधित शिक्षकावर पोस्को कायद्याचे कलम, अॅट्रॉसिटी कायद्याचे कलम तसेच विनयभंगाच्या गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकरण समोर आल्यानंतर ट्युशन क्लास परिसरात तसेच संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. शिक्षणाच्या नावाखाली पालक आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी ट्युशन क्लासमध्ये पाठवतात; मात्र अशा घटना घडल्याने पालकांच्या मनात भीती निर्माण होत असल्याचेही दिसून येत आहे.










