Maharashtra Weather : राज्यातील काही भागांत कडाक्याच्या थंडीसह पावसाच्या सरी कोसळणार, काय सांगतं हवामानशास्त्र?
maharashtra weather : भारतीय हवामान विभाग (IMD) आणि स्थानिक हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान राहील. थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता असून, किमान तापमानात घसरण होईल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात सध्या कडाक्याच्या थंडी
24 नोव्हेंबर रोजी हवामानात बदल अपेक्षित
भारतीय हवामान विभाग (IMD) आणि स्थानिक हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार...
Maharashtra Weather : राज्यात सध्या कडाक्याच्या थंडी असून वातावरणात गारवा निर्माण झाला असताना, 24 नोव्हेंबर रोजी हवामानात बदल अपेक्षित आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि स्थानिक हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान राहील. थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता असून, किमान तापमानात घसरण होईल.
हे ही वाचा : स्मृती मंदानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका, लेकीनं लग्न पुढं ढकलण्याचा घेतला निर्णय...
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव राज्याच्या किनारी भागात दिसून येत आहे. यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. पुणे, नाशिक आणि कोल्हापूरसारख्या भागांत किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे, पण एकूणच थंडी वाढेल. विदर्भ आणि मराठवाड्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, जाणून घेऊयात हवामानाचा अंदाज.
कोकण विभाग :
कोकण विभागात पालघर जिल्ह्यांत कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हवामान विभागाने हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. तसेच तापमानाच घट होण्याची अधिक शक्यता आहे. तर काही प्रमाणत थंडी देखील जाणवेल.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्र विभागात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. तसेच धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये कोरडं हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे.










