कोल्हापूर : निवडणूक लढायचीये माहेरी जाऊन 10 लाख आण, सासऱ्याची मागणी; सूनेची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई तक

Kolhapur Crime : कोल्हापूर : निवडणूक लढायचीये माहेरी जाऊन 10 लाख आण, सासऱ्याची मागणी; सूनेची गळफास घेऊन आत्महत्या

ADVERTISEMENT

Kolhapur Crime
Kolhapur Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : निवडणूक लढायचीये माहेरी जाऊन 10 लाख आण

point

सासऱ्याची मागणी; सूनेची गळफास घेऊन आत्महत्या

कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) : निवडणूक खर्चासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याचा सततचा दबाव आणि त्यातून होणारा छळ सहन न झाल्याने एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कुरुंदवाड शहरात समोर आली आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी पती इंजमाम राजमहंमद गरगरे (वय 31) आणि जाऊ समिना इलहान गरगरे (वय 28, दोघेही रा. कुरुंदवाड) या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सासू मुमताज गरगरे आणि सासरे राजमहंमद गरगरे यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

अधिकची माहिती अशी की, कौसर गरगरे हिने गुरुवारी (दि. 20) राहत्या घरी गळफास घेऊन जीव दिला. ही घटना समोर आल्यानंतर तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत माहेरच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. कौसरच्या मृत्यूची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबात तीव्र वाद निर्माण झाला. माहेरच्या लोकांनी ही घटना नैसर्गिक नसून संशयास्पद असल्याचा आरोप करत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. या परिस्थितीमुळे वातावरण तंग झाले होते.

हेही वाचा : मासिक पाळी आल्याने आईने मुलीला दोन वर्षे अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलं, धक्कादायक प्रकाराने पोलिसही हादरले

दरम्यान, मृत कौसरचा भाऊ अलताफ आवटी (रा. जयसिंगपूर) याने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत पती, सासू, सासरे आणि जाऊ यांनी कौसरवर सतत शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पतीच्या व्यवसायासाठी तसेच सासऱ्याच्या निवडणुकीच्या खर्चासाठी दहा लाख रुपये घेऊन येण्याची जबरदस्ती केली जात असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या सततच्या आर्थिक मागण्या आणि छळामुळेच कौसरने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे भाऊने स्पष्ट केले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp