छत्रपती संभाजीनगर : ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर रिक्षा घातली, अन् नंतर फरफटत नेलं; पाहा व्हिडीओ
Chhatrapati sambhaji nagar Crime : छत्रपती संभाजीनगर : ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर रिक्षा घातली, अन् नंतर फरफटत नेलं; पाहा व्हिडीओ
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
छत्रपती संभाजीनगर : ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर रिक्षा घातली
अन् नंतर फरफटत नेलं; पाहा व्हिडीओ
Chhatrapati sambhaji nagar Crime : छत्रपती संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंप महावीर चौक परिसरात रविवारी घडलेली एक गंभीर घटना घडलीये. वाहतूक नियमनासाठी ड्युटीवर तैनात असलेल्या ट्रॅफिक पोलिसांना एका ऑटोचालकाने जोरदार धडक दिली. धक्कादायक म्हणजे, ही धडक झाल्यानंतरही ऑटोचालक थांबला नाही. उलट काही अंतरापर्यंत त्या पोलिस कर्मचाऱ्याला फरफटत नेलं आहे. यामध्ये ट्रॅफिक पोलीस तुकाराम टाकसाले जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, युसुफ मोहम्मद अली अन्सारी नावाच्या ऑटोचालकाने प्रथम टाकसाले यांना उडवले. त्यानंतर दुसऱ्यांदा जाणीवपूर्वक ऑटो चढवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात अमलदार टाकसाले ऑटोच्या खाली अडकले. काही अंतरापर्यंत त्यांना फरफटत नेलं असून चालकाने रिक्षा थांबवली देखील नाही. मात्र, अशा परिस्थिती स्वतःला बाहेर काढण्यात ट्रॅफिक पोलिसाने यश मिळवले. त्या वेळी ऑटोमध्ये काही प्रवासीही उपस्थित होते, त्यामुळे त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता.
दरम्यान, अपघात घडताच आरोपी ऑटोचालक वाहनासह पळून गेला. पोलिसांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात ही संपूर्ण घटना स्पष्टपणे कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. पोलिस कर्मचाऱ्याला धडक देणारा ऑटो आणि चालक ओळखल्यानंतर वेदांतनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला.










