Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज, तर काही ठिकाणी हुडहुडी

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात हवामान विभागाने महत्त्वाची अपडेट दिली आहे, अशातच 25 नोव्हेंबर रोजी हवामानाचा अंदाज कसा असेल समजून घ्या.

ADVERTISEMENT

maharashtra weather
maharashtra weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हवामानाची स्थिती वेगवेगळी

point

हवामानाच्या नेमक्या अंदाजासाठी (IMD) तपासा

Maharashtra Weather : राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हवामानाची स्थिती वेगवेगळी असते. ज्यात मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या प्रमुख शहरांसाठी ही स्थिती आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यात सामान्यतः कोरडे आणि उष्ण हवामानाची शक्यता असते, पण काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामानाच्या नेमक्या अंदाजासाठी स्थानिक हवामान विभागाची (IMD) वेबसाइट तपासून घ्या. 

हे ही वाचा : 'यै मुंबई नही, गांधीनगर है, इधर भैयालोग का चालेगा..' राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना परप्रांतियाकडून शिवीगाळ

कोकण विभाग :

कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदु्र्ग, मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यांमध्ये काही अंशी प्रमाणात वातावणात बदल जाणवू शकतो.या सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरड्या हवामानाची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र : 

मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. या सर्वच जिल्ह्यात हवामान विभागाने कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवलेली आहे. या विभागातील काही जिल्ह्यांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा विभाग :

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या वातावरणाचा इशारा दिला आहे. याच विभागात तापमानात फारशी तफावतता जाणवणार नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp