मुंबईची खबर: प्रवाशांसाठी 3 नव्या उड्डाणपुलांची निर्मिती, विमानतळाशी थेट कनेक्शन अन्... लवकरच होणार कायापालट!

नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन (NMMC)ने ठाणे-बेलापूर रोडच्या 846 कोटी रुपयांच्या दुरुस्तीचे काम सुरू केलं असल्याची बातमी समोर आली आहे.

'या' रोडचा लवकरच होणार कायापालट!

'या' रोडचा लवकरच होणार कायापालट!

मुंबई तक

• 03:50 PM • 25 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रवाशांसाठी 3 नव्या उड्डाणपुलांची निर्मिती

point

विमानतळाशी थेट कनेक्शन अन्...

point

लवकरच मुंबईतील 'या' रोडचा होणार कायापालट!

Mumbai News: नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन (NMMC)ने ठाणे-बेलापूर रोडच्या 846 कोटी रुपयांच्या दुरुस्तीचे काम सुरू केलं असल्याची बातमी समोर आली आहे. हा परिसरातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या वाहतूक मार्गांपैकी एक असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारच्या हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल (HAM) अंतर्गत येणाऱ्या या अपग्रेडमध्ये सरकारी खर्च आणि कंत्राटदारांच्या स्थगित देयकांचा समावेश असेल आणि त्यात तीन नवीन उड्डाणपूल तसेच आर्टेरिअल भागाची पुनर्बांधणी समाविष्ट असणार आहे.

हे वाचलं का?

कुठे बनणार 3 फ्लायओव्हर्स? 

रबाळे जंक्शन (171 कोटी), क्रिस्टल हाऊस ते पावणे (110 कोटी) आणि महापे येथील BASF कंपनीपासून ह्युंदाई शोरूमपर्यंत (338 कोटी) फ्लायओव्हर्स बांधले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, मुख्य कॉरिडॉरसाठी 227 कोटी रुपयांची पुनर्बांधणी योजना आहे. तुर्भे येथे आणखी एका उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे मात्र, या बांधकामात बऱ्याच काळापासून रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे सिटी इंजीनिअर शिरीष आरदवाड याबाबत म्हणाले की, ठाणे-बेलापूर रस्त्याचे नूतनीकरण केलं जाणार असून यामध्ये रस्ते नूतनीकरण आणि तीन नवीन उड्डाणपुलांचा समावेश असेल. 

हे ही वाचा: Govt Job: आता सरकारी बँकेत मिळवा मॅनेजर पदावर नोकरी! 'या' भरतीसाठी आत्ताच करा अर्ज...

याव्यतिरिक्त, एनएमएमसीने तीन नवीन उड्डाणपुलांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडून 400 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. ठाणे-बेलापूर पट्ट्यात एमआयडीसीच्या औद्योगिक आणि रेसिडेन्शिअल (निवासी) मंजुरींमुळे ट्रॅफिक वाढली आहे आणि यामुळे खर्चाचा भार वाटून घेतला पाहिजे, असा महापालिकेने युक्तिवाद केला आहे. या दुरुस्तीच्या कामात नवीन ड्रेनेज लाईन्स बसवून, खराब झालेले सिमेंट ब्लॉक बदलून आणि उपलब्ध असलेल्या ठिकाणी झाडे लावून स्ट्रक्चरल बिघाड तसेच वारंवार येणाऱ्या पावसाळ्यातील पुरांची समस्या दूर केली जाईल. 

हे ही वाचा: अडीच एकरातील पीक हत्तींनी तुडवलं, वर्षभराच्या मेहनतीची राखरांगोळी; नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

या कॉरिडोरचं काम पूर्ण झाल्यानंतर ते नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या दिशेला जाणाऱ्या ठाणे, मीरा भाईंदर आणि ऐरोली ते पनवेल तसेच उरण पर्यंत ट्रॅफिकसाठी एका सोपं नॉर्थ-साउथ अॅक्सेस म्हणून ठाणे-बेलापूर रोडला जोडणारा कटाई बोगदा आणि शीव-पनवेल महामार्ग त्याला जोडत असल्याने, हा प्रकल्प या परिसरातील मोबिलिटी नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग बनण्यास तयार असल्याचं सांगण्यात येत आहे. हा एक मोठ्या कनेक्टिव्हिटी प्लॅनचा भाग असून त्यामध्ये 6,300 कोटी रुपयांचा 25 किमी लांबीचा ठाणे-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एलिव्हेटेड कॉरिडोर आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) ला थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणारा उलवे कोस्टल रोड समाविष्ट आहे.

    follow whatsapp