Crime News : जे.जे. रुग्णालयात निवासी डॉक्टर ओंकार कवितके (वय 32) यांने अटल सेतूवरून उडी घेत आत्महत्या केली. 7 जुलै रोजी तो रुग्णालयातून आपल्या घरी कळंबोली येथे निघाला होता. घरी निघण्यापूर्वी त्याने आईला फोनद्वारे संपर्क करत घरी लवकर जेवायला येतो असं सांगितलं होतं. पण त्यानंतर त्यानं उचललेल्या पावलामुळे सर्व होत्याचं नव्हतं झालं. यामुळे त्याच्या आईवर आणि कवितके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अटल सेतूवरून त्याने खाडीत उडी मारून त्यानं आपलं आयुष्य संपवलं. सोमवारपासून त्याचा शोधाशोध सरू आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : विकृतिचं टोक! अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, मित्रांनाही एक चान्स दे असं सांगितलं, अखेर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल
अटल सेतूवर कार थांबवली अन्..
डॉ. ओंकार कवितके हा आपल्या आईसोबत कळंबोली येथे राहत होता. सोमवारी रात्री त्याने साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवर खाडीमध्ये उडी मारली. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी ओंकार घरी निघाला होता, तेव्हा अटल सेतूवर येताच त्याने आपली कार थांबवली आणि अटल सेतूच्या पुलावरून खाडीत उडी मारली.
या प्रकरणात उलवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तपास केला. त्यावेळी पोलिसांनी मोबाईल फोन लॉक उघडला आणि काही मोबाईल क्रमांकावर कॉल केले. त्यातून हा मोबाईल ओंकारचा असल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, डॉ. ओंकार गेल्या सहा महिन्यांपासून जे.जे. रुग्णालयात कार्यरत होता. आत्महत्येनंतर पोलिसांनी मासेमारी करणाऱ्यांना मृतदेह किनाऱ्यावर आढळ्यास माहिती द्यावी, असे सांगितलं होतं.
हेही वाचा : आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिंदे गटाच्या आमदाराने घातला राडा, कॅन्टीन व्यवस्थापकाला केली मारहाण
आईला शेवटचा फोन
पोलिसांनी सांगितलं की,आम्ही तपासादरम्यान त्याचा मोबाईल तपासला असता, त्याने आईला शेवटचा फोन केला होता. तो आईला म्हणाला की, तो लवकरच घरी जेवायला घरी येतोय. अशी माहिती आता उलवे पोलिसांनी दिली आहे. ओंकारने टोकाची भूमिका का घेतली? याता पोलीस पुढील तपास करत आहेत. तसेच त्याच्या मित्र मैत्रिणींकडे पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
