diva csmt local shocking viral video :मुंबईच्या उपनगरी रेल्वेतील जीवघेण्या प्रवासाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. दिवा–सीएसएमटी लोकलमध्ये धावत्या गाडीच्या दारात लटकून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा जीव थोडक्यात वाचावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, काही क्षणांचा फरक पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त होत आहे. या व्हिडिओमुळे मुंबईच्या लोकलमधील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Jantar Mantar Protest: अभिनेते प्रकाश राज ज्या ट्रकवर चढले त्याच्या टायरची हवाच पोलिसाने काढली, प्रचंड गोंधळ
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, महिलेचा वाचला जीव
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला लोकलच्या दारात लटकून प्रवास करताना दिसत आहे. धावत्या गाडीदरम्यान तिची साडी रेल्वे पुलाच्या खांबाला घासल्याने काही क्षणांसाठी अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा प्रसंग इतका थरारक होता की, क्षणभर महिलेचा तोल जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि महिलेचा जीव वाचला. या घटनेनंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा : Jantar Mantar Protest: अभिनेते प्रकाश राज ज्या ट्रकवर चढले त्याच्या टायरची हवाच पोलिसाने काढली, प्रचंड गोंधळ
सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकांचा जीवघेणा प्रवास
रेल्वे प्रशासनाकडून वारंवार प्रवाशांना लोकलच्या दारात उभे राहून किंवा लटकून प्रवास करू नये, असे आवाहन केले जाते. तरीही प्रत्यक्षात गर्दीमुळे अनेक प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव कायम आहे. विशेषतः सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने अनेक प्रवासी दारात उभे राहून किंवा लटकून प्रवास करण्यास भाग पडतात. अशा प्रकारच्या धोकादायक प्रवासामुळे दरवर्षी अनेक प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू होतो, तर अनेक जण गंभीर जखमी होतात.
लोकलच्या फेऱ्या वाढवून गर्दी कमी करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र अद्याप त्यावर ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे धावत्या लोकलमधील हा थरारक प्रसंग केवळ व्हायरल व्हिडिओपुरता मर्यादित नसून, उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर इशारा देणारा ठरत आहे. दिवा–सीएसएमटी लोकलमधील या घटनेने पुन्हा एकदा गर्दी, धोकादायक प्रवास आणि सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजनांची गरज अधोरेखित केली आहे.
ADVERTISEMENT












