मुंबई : सार्वजनिक शौचालयात घडलं भयंकर, दोन तरुणांचा मृत्यू, 'तो' वायू नेमका आला कुठून?

मुंबई तक

• 04:11 PM • 27 Sep 2026

गोरेगाव (पूर्व) येथील एका सार्वजनिक शौचालयात भयंकर घटना घडली. केमिकलच्या उग्र वासाने गुदमरून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Mumbai News

Mumbai News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सार्वजनिक शौचालयात घडलं भयंकर

point

दोन तरुणांचा मृत्यू

point

'तो' वायू नेमका आला कुठून?

Mumbai News : मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथील राम मंदिर परिसरातील एका सार्वजनिक शौचालयात संशयास्पद केमिकलच्या उग्र वासाने गुदमरून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृणालताई पुलाजवळ, पारसी पंचायत गेटसमोर असलेल्या सार्वजनिक शौचालयात 27 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शौचालयातून केमिकलचा तीव्र वास येत असून दोन जण आतमध्ये गुदमरल्याची माहिती स्थानिकांनी प्रशासनाला दिली.

हे वाचलं का?

बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल

घटनेची माहिती मिळताच दोन्ही तरुणांना तातडीने बेशुद्धावस्थेत जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. मृतांची ओळख 24 वर्षीय प्रभाकर धनीवार आणि 18 वर्षीय भाविन देसाई अशी पटली आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना मध्यरात्री 12 च्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले होते आणि पहाटे 3.49 वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली.

हे ही वाचा : बीड : शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या

हानिकारक वायू कुठून आला?

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, 108 रुग्णवाहिका सेवा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) 'पी दक्षिण' वॉर्डचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून परिसराची पाहणी करण्यात आली असून शौचालयात हानिकारक वायू किंवा केमिकल कुठून पसरले, याचा शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा : पैसा-पाणी: मी आहे बॉन्ड!

मृत्यू नेमका कसा झाला?

सार्वजनिक शौचालयात हे प्राणघातक केमिकल कसे पोहोचले आणि दोन्ही तरुणांचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीमुळे झाला, याचा सखोल तपास सध्या पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या प्रकरणातील पुढील तपासानंतरच केमिकलच्या स्त्रोताबाबत सविस्तर माहिती समोर येऊ शकेल.