Govt Jobs : बँक ऑफ बडोदामध्ये 1,100 पदांची भरती; 80 हजारांहून अधिक पगार

मुंबई तक

• 07:00 PM • 25 Sep 2026

बँक ऑफ बडोदाने 1,100 जागांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 1 ऑक्टोबर आहे. पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घ्या सविस्तर.

Bank Of Baroda Recruitment

Bank Of Baroda Recruitment

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बँक ऑफ बडोदामध्ये 1,100 पदांची भरती

point

80 हजारांहून अधिक पगार

Bank Of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदाने वेल्थ एक्झिक्युटिव्ह आणि क्रेडिट ॲनालिस्ट या पदांच्या एकूण 1,100 जागांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड/स्केल-1 मधील वेल्थ एक्झिक्युटिव्हच्या 1,000 जागा आणि मिडल मॅनेजमेंट ग्रेड/स्केल-2 मधील क्रेडिट ॲनालिस्टच्या 100 जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी 1 सप्टेंबर 2026 ही कट-ऑफ तारीख गृहीत धरण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये कुठेही सेवा बजावावी लागेल.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 4 सप्टेंबरपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची सुधारित अंतिम तारीख 1 ऑक्टोबर 2026 आहे. वेल्थ एक्झिक्युटिव्ह पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीसह IC 38 किंवा NISM ची विशिष्ट प्रमाणपत्रे आणि संबंधित क्षेत्रातील 2 वर्षांचा विक्री अनुभव आवश्यक आहे. तसेच, क्रेडिट ॲनालिस्ट पदासाठी पदवीसह सीए (CA) ही पात्रता आणि अनुसूचित व्यावसायिक बँकेत किमान 1 वर्षाचा बँकिंग अनुभव असणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी विहीत मुदतीत बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : 'डोळ्यांदेखत पीक करपून गेलं...' बीडमधील तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन, ग्रामस्थांची मागणी काय?

किती आहेत जागा?

वेल्थ एक्झिक्युटिव्ह पदासाठीच्या एकूण 1,000 जागांमध्ये  जनरल - 405, इतर मागासवर्गीय (OBC) - 270, अनुसूचित जाती (SC) - 150, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) - 100 आणि अनुसूचित जमाती (ST) - 75 असा वर्गनिहाय कोटा निश्चित करण्यात आला आहे. क्रेडिट ॲनालिस्ट पदाच्या 100 जागांमध्ये जनरल - 40, OBC - 27, SC - 15, EWS - 10 आणि ST - 8 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना भरघोस वेतनश्रेणी आणि इतर सरकारी भत्ते दिले जातील.

हे ही वाचा : "माझ्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न, मी त्यांच्याप्रमाणे पक्ष बदलणार नाही", स्वीडनमधून पुतणीचा विखेंना टोमणा

पगार किती मिळणार?

वेतनश्रेणीचा विचार करता, वेल्थ एक्झिक्युटिव्ह (JMG/S-I) पदासाठी 48,480 ते 85,920 मूळ वेतन दिले जाईल. तर क्रेडिट ॲनालिस्ट (MMG/S-II) या पदासाठी 64,820 ते 93,960 या वेतनश्रेणीनुसार पगार निश्चित केला जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना बँकेच्या www.bankofbaroda.bank.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन सर्व अटी व शर्ती तपासून मुदतीपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.