Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, यलो-ऑरेंजचा IMD चा अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 24 Sep 2026

Maharashtra Weather : कोकणात सध्या हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. तर काही भागातील जिल्ह्यांना पावसाचा यलो तर कुठे ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे. तर काही ठिकाणी हवामान कोरडं राहण्याची अधिकची शक्यता आहे.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

कोकणात सध्या हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

point

काही ठिकाणी ऑरेंज-यलो अलर्टची शक्यता

Maharashtra Weather : राज्यात पावसाने दांडी मारली असून कोकणात सध्या हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. तर काही भागातील जिल्ह्यांना पावसाचा यलो तर कुठे ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे. तर काही ठिकाणी हवामान कोरडं राहण्याची अधिकची शक्यता आहे. अशातच जाणून घ्या 24 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे वर्तवविला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : हात पकडून घरात ओढलं, 24 वर्षीय दिव्यांग महिलेवर लैंगिक अत्याचार

कोकण 

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. 

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार येथे कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. नाशिकमध्ये विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगरात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा येथे विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तसेच याच जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज वर्तविण्यात येतोय. सांगली आणि सोलापूर येथे विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. 

हे ही वाचा : 'देशात पुन्हा निवडणूक घ्या', निवडणूक आयोगाच्या मतभेद प्रकरणात उद्धव ठाकरेंची मागणी

विदर्भ 

विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे.