Iran-Israel युद्धाची झळ भारतीयांपर्यंत, ड्रोन हल्ल्यात मुंबईतील युवकाचा मस्कतमध्ये मृत्यू; महिन्याभरापूर्वीच आईचंही निधन

Iran Israel War : दीक्षित सोलंकी हे मूळचे दीव येथील रहिवासी होते, मात्र रोजगारासाठी ते काही वर्षांपूर्वी मुंबईत आले आणि कांदिवलीत स्थायिक झाले होते. त्यांचे वडील अमृतलाल सोलंकी हे दीवमधील मासळी व्यावसायिक आहेत. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वीच दीक्षित यांच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यविधीनंतर ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते, मात्र ही त्यांची शेवटची भेट ठरली.

Iran Israel War

Iran Israel War

मुंबई तक

06 Mar 2026 (अपडेटेड: 06 Mar 2026, 12:05 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

Iran-Israel युद्धाची झळ भारतीयांपर्यंत

point

ड्रोन हल्ल्यात मुंबईतील युवकाचा मस्कतमध्ये मृत्यू

point

महिन्याभरापूर्वीच आईचंही निधन

Iran Israel War, मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची झळ आता थेट भारतीयांना सोसावी लागत आहे. मस्कतच्या समुद्री सीमेत झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इराण आणि इस्रायल- अमेरिकेत पेटलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गावरील सुरक्षा धोक्यात आली आहे. या युद्धाचा फटका आता मुंबईला बसला असून, ओमानच्या आखातात (Gulf of Oman) मस्कत जवळ एका मालवाहू तेलवाहू टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या कांदिवली येथील 25 वर्षीय दीक्षित सोलंकी या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षित सोलंकी हे “MKD Vyom” नावाच्या 'मार्शल आयलंड्स'चा ध्वज असलेल्या ऑइल टँकरवर क्रू मेंबर म्हणून कार्यरत होते. मस्कतच्या किनाऱ्यापासून साधारण 52 नॉटिकल मैल अंतरावर असताना, स्फोटकांनी भरलेल्या एका ड्रोन बोटीने या टँकरला धडक दिली. हा हल्ला इतका भीषण होता की टँकरच्या इंजिन रूममध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत दीक्षित यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : भारताचा 'हा' जुना मित्र बनणार संकटमोचक, 95 लाख बॅरल कच्चे तेल पाठवणार; भारताकडे 'इतकाच' तेलसाठा शिल्लक

महिनाभरापूर्वीच झाला होता मातृशोक

दीक्षित सोलंकी हे मूळचे दीव येथील रहिवासी होते, मात्र रोजगारासाठी ते काही वर्षांपूर्वी मुंबईत आले आणि कांदिवलीत स्थायिक झाले होते. त्यांचे वडील अमृतलाल सोलंकी हे दीवमधील मासळी व्यावसायिक आहेत. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वीच दीक्षित यांच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यविधीनंतर ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते, मात्र ही त्यांची शेवटची भेट ठरली.

इतर भारतीय खलाशीही बेपत्ता

या घटनेच्या अवघ्या एक दिवस आधी 'Hormuzच्या सामुद्रधुनी'त (Strait of Hormuz) “MV Skylight” नावाच्या जहाजावरही असाच हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर बिहारचे आशिष कुमार आणि राजस्थानचे दलीप सिंह हे दोन भारतीय खलाशी गेल्या 48 तासांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू असून, त्यांच्या जीविताबाबतही भीती व्यक्त केली जात आहे.

युद्धाची झळ भारतापर्यंत

इराण-इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या संघर्षात आतापर्यंत तीन भारतीय खलाशांना आपला जीव गमवावा लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गावर भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, भारत सरकार या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बदलापूर : मोबाईल फोनमधील मॅसेज डिलीट झाला म्हणून 36 वर्षीय मुलाने जन्मदात्या आईचाच गळा आवळला...
 

    follow whatsapp