Mumbai Crime: कुर्ला परिसरातून पाच महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. तसेच, हत्येनंतर पीडित तरुणाला मीठी नदीत फेकून देण्यात आल्याचं वृत्त आहे. विनोबा भावे नगर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी तरुण अंकित साहू याला अटक करून त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
मृत तरुणाचं नाव राहुल कुमार योगेंद्र प्रसाद (20) असून तो कुर्ला पश्चिमेकडील क्रांती नगर, बैल बाजार परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होता. तसेच, पीडित तरुण हा एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होता. आरोपी अंकित साहू सुद्धा त्याच परिसरातील रहिवासी असून ते एकमेकांना ओळखत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, 24 जुलै 2025 रोजी राहुल घरातून बाहेर पडला होता आणि त्यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुंबियांनी सुद्धा त्याचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच माहिती हाती न लागल्याने विनोबा भावे नगर पोलीस स्टेशनमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध
त्यानंतर, PSI शिवाजी तायडे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली. या पथकाने टेक्निकल तपास सुरू करून राहुलच्या मोबाईल फोनचं लोकेशन आणि कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले. तपासादरम्यान, राहुल सतत आरोपी अंकित साहू याच्या संपर्कात असल्याचं उघडकीस आलं. टेक्निकल तपास केला असता 24 जुलै रोजी दोघे एकाच ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती मिळाली. या पुराव्यांच्या आधारे, पोलिसांनी अंकितला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली.
हे ही वाचा: Govt Job: भारतीय टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी! 10 वी पास उमेदवारांनी आत्ताच करा अर्ज...
ऑनलाइन गेमिंगसाठी मित्राच्या अकाउंटमधून घेतले पैसे
चौकशीदरम्यान, अंकितने राहुलची हत्या केल्याचं कबूल केलं. तसेच, हत्येनंतर राहुलला मीठी नदीत फेकून देण्यात आल्याचं राहुलने सांगितलं. यानंतर, अंकित घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, राहुलला मोबाईल बँकिंगची पुरेशी माहिती नसल्याने त्याने आपल्या प्रोव्हिडंट फंड अकाउंटमधून ऑनलाइन पैसे काढण्यासाठी अंकितची मदत घेतली होती. दरम्यान, अंकितला राहुलच्या अकाउंटची माहिती मिळाली. तसेच, तपासादरम्यान अंकितला मोबाईल अॅपवर ऑनलाइन गेमिंग आणि जुगाराचं व्यसन होतं. त्याने राहुलच्या अकाउंटमधून सुमारे 30 हजार रुपये घेतले आणि ते पैसे त्याने ऑनलाइन गेमिंगमध्ये गमावले.
हे ही वाचा: महाराष्ट्र हादरला, संशयाच्या भूतानं पछाडलं, बायकोला दगडाने ठेचून संपवलं अन् पतीची आत्महत्या, 4 मुलं झाली अनाथ
राहुलला अंकितच्या या कृत्याबद्दल कळालं असता त्याने त्याच्याकडील पैसे परत मागितले आणि अंकितच्या आईला याबद्दल सांगण्याची धमकी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, याच भितीमुळे अंकितने राहुलचा काटा काढण्याची योजना आखली. 24 जुलै रोजी अंकितने राहुलला मीठी नदीजवळ बोलवलं. त्यावेळी, अंकितने पीडित राहुलला मागून धक्का दिला आणि त्याचा मोबाईल फोन घेऊन तो घटनास्थळावरून फरार झाला. विनोबा भावे नगर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतलं. तसेच, राहुलच्या मृतदेहाच्या शोधासाठी मीठी नदीत सर्च ऑपरेशन जारी आहे.
ADVERTISEMENT











