Govt Job: भारतीय टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी! 10 वी पास उमेदवारांनी आत्ताच करा अर्ज...
भारतीय टपाल विभागाकडून 'स्टाफ कार ड्रायव्हर्स' पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मेल मोटर सर्व्हिस अंतर्गत ही भरती केली जात असून पात्र उमेदवारांना या माध्यमातून पर्मनंट नोकरी आणि आकर्षक वेतन मिळवण्याची संधी आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारताच्या टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी!
10 वी पास उमेदवारांनी आत्ताच करा अर्ज...
Govt Job: सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या उमेदवारांसाठी इंडियन पोस्ट विभागात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय टपाल विभागाकडून 'स्टाफ कार ड्रायव्हर्स' पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मेल मोटर सर्व्हिस अंतर्गत ही भरती केली जात असून पात्र उमेदवारांना या माध्यमातून पर्मनंट नोकरी आणि आकर्षक वेतन मिळवण्याची संधी आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण असण्यासोबत त्यांच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे.
एकूण 48 पदे भरली जाणार...
या भरतीअंतर्गत एकूण 48 पदे भरली जाणार असून उमेदवार 19 जानेवारी 2026 पर्यंत यासाठी अर्ज करू शकतात. स्टाफ कार ड्रायव्हर पदावर नियुक्ती झाल्यानंतर, उमेदवारांना वेगवेगळ्या टपाल विभाग कार्यालयांत तैनात केलं जाईल. तसेच, उमेदवारांची पात्रता, ड्रायव्हिंग अनुभव आणि विभागाच्या नियमांवर आधारित त्यांची निवड केली जाईल.
पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीअंतर्गत, 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. यासोबत, उमेदवारांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स तसेच, हल्के आणि जड वाहने चालवण्याचा अनुभव सुद्धा नियुक्तीसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. या भरतीसाठी 18 ते 27 वर्षे उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
हे ही वाचा: मुंबई: साखरझोपेत असताना फ्रीजचा स्फोट... एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू, गोरेगावमध्ये खळबळ
किती मिळेल वेतन?
उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर, त्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार लेव्हल 2 अंतर्गत 19,900 रुपये मासिक वेतन दिलं जाईल. यासोबतच कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार, महागाई भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर भत्ते देखील दिले जातील. हे पद कायमस्वरूपी सरकारी सेवेअंतर्गत येतं, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षा, भविष्य निर्वाह निधी, पेन्शन आणि इतर सामाजिक सुरक्षा लाभ देखील मिळतील.










