मुंबई: साखरझोपेत असताना फ्रीजचा स्फोट... एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू, गोरेगावमध्ये खळबळ
वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात महिलेचा भयानक अवस्थेत मृतदेह आढळल्याचं वृत्त आहे. मृत महिलेचं डोकं पूर्णपणे ठेचण्यात आलं होतं. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात महिलेची निर्घृण हत्या
डोकं पूर्णपणे ठेचलं अन् कपडे फाटलेल्या अवस्थेत...
Mumbai News: मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरातील भगत सिंह नगरमध्ये आज म्हणजेच शनिवारी (10 जानेवारी) पहाटे एका निवासी घरात भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या आगीत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये एका 12 वर्षीय मुलाचा आणि एका 19 वर्षीय तरुणीचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.
विद्युत वायरिंग आणि फ्रीजचा स्फोट
अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, राजाराम लेनवरील ग्राउंड प्लस वन (G+1) इमारतीत पहाटे 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घराच्या ग्राउंड फ्लोअर म्हणजेच तळमजल्यावरील विद्युत वायरिंग आणि तिथल्या फ्रीजचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली आणि ती लवकरच पहिल्या मजल्यापर्यंत पसरल्याचं वृत्त आहे.
हे ही वाचा: वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात महिलेची निर्घृण हत्या; डोकं पूर्णपणे ठेचलं अन् कपडे फाटलेल्या अवस्थेत...
घरातील तिघांचा मृत्यू
अग्निशमन दलातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिकांनी पाण्याच्या बादल्यांच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, अग्निशमन दलाने वीजपुरवठा खंडित करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, आग लागलेल्या घरात तीन जण फसलेले होते आणि आग विझवून त्यांना घराबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर, त्या तिघांना पोलीस व्हॅन आणि खाजगी वाहनातून तात्काळ ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना ब्रॉट डेड म्हणजेच मृत घोषित केलं.
हे ही वाचा: जालना : मामीच्या मदतीने मामाचा आपल्याच भाचीवर लैंगिक अत्याचार, तब्बल दोन वर्षांपासून अल्पवयीन पीडितेसोबत...
घटनेतील मृत व्यक्तींची नावे
1. हर्षदा पावस्कर (19 वर्षे)
2. कुशल पावस्कर (12 वर्षे)
3. संजोग पावस्कर (48 वर्षे)










