Latur Crime: लातूर जिल्ह्यात एका 30 वर्षीय तरुणाने त्याच्याच घरातून आपल्या आईने दागिने चोरल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनीच या प्रकरणाबाबत एका न्यूज एजन्सीला माहिती दिली. आरोपीने त्याच्याच घरात घुसून आपल्या आईचे दागिने चोरले. संबंधित प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि तक्रार मिळाल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT
मुलानेच आईचे दागिने चोरले अन्...
सुनीता दगडू भामरे (50) अषी तक्रारदार महिलेची ओळख समोर आली असून ती लातूरच्या भडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. संबंधित महिलेने पोलिसांना माहिती देताना सांगितलं की, सोमवारी एक अज्ञात पुरुष त्यांच्या घरात शिरला आणि त्याने घरातील सोन्याचे दागिने चोरले. चोरलेल्या दागिन्यांमध्ये एक हार, सहा अंगठ्या आणि दोन झुमक्यांचा समावेश आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांनो! 3,550 घरांसाठी लॉटरी निघणार... म्हाडाची मोठी घोषणा! मोक्याच्या जागी 31 लाखांत हक्काचं घर
आरोपीने गुन्हा केला कबूल
प्रकरणाची तक्रार मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने तपास सुरू केला. लोकल इंटेलिजन्स इनपुट, संशयितांची पडताळणी आणि टेक्निकल विश्लेषणानंतर तक्रारदार महिलेचा 30 वर्षीय मुलगा प्रशांत भामरे याच्यावर पोलिसांना संशय आला आणि घटनेनंतर केवळ तीन तासांतच आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. अखेर, कठोर चौकशीनंतर आरोपी मुलाने चोरीचा गुन्हा कबूल केला.
हे ही वाचा: मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात डीसीपींसोबत शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
पोलिसांनी दिली माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने आपल्या आईचे दागिने चोरले आणि ते आपल्याच घरातील एका तिजोरीत लपवून ठेवले. चौकशीनंतर, पोलिसांनी मुलाने चोरलेले दागिने ताब्यात घेतले आणि तक्रारदार महिलेकडे सोपवले. ज्या पद्धतीने चोरीची घटना घडली, त्यावरून तपासादरम्यान महिलेच्या मुलाकडे संशयाची सुई वळली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT











