जालन्यात चालत्या ट्रकचे टायर निखळून दुचाकीवर आदळले, भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी अंत

Jalna Accident : जालन्यात चालत्या ट्रकचे टायर निखळून दुचाकीवर आदळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. भोकरदन-जालना रोडवरील सोयगाव देवी पाटीजवळ हा अपघात घडला. या दुर्दैवी घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव राजू बाबुराव दुधे (वय 48) असे आहे. 

Jalna Accident

Jalna Accident

मुंबई तक

• 04:05 PM • 26 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

ट्रकचे टायर निखळून दुचाकीवर आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

point

भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Jalna Accident : गौरव साळी - जालन्यात चालत्या ट्रकचे टायर निखळून दुचाकीवर आदळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. भोकरदन-जालना रोडवरील सोयगाव देवी पाटीजवळ हा अपघात घडला. या दुर्दैवी घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव राजू बाबुराव दुधे (वय 48) असे आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुण्यात क्रेनचा पट्टा तुटल्याने अपघात, सळई पडून महिला कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

वेगात आलेला ट्रक दुचाकीस्वारावर आदळला

घडलेल्या घटनेनुसार, राजू बाबुराव दुधे हे  दुपारच्या सुमारास आपल्या दुचाकीने (क्रमांक MH 20 GA 7075) भोकरदनकडून सिल्लोडकडे जात होते. याचदरम्यान समोरून येणाऱ्या एका ट्रेकचे (क्रमांक RJ 02 GC 6061) टायर अचानकपणे निखळला. दरम्यान, वेगात आलेला ट्रक अचानकपणे दुधे यांच्या दुचाकीवर आदळला. 

भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

ही धडक इतकी भीषण होती की, राजू दुधे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अपघातादरम्यान नागरिकांनी तत्काळपणे घटनास्थळी धाव घेत त्यांना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; डॉक्टरांनी उपचार करताना त्यांना मृत घोषित केले. संबंधित घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. 

हे ही वाचा : नागपूर : 64 वर्षीय महिलेवर बैलाने हल्ला केला, पीडितेच्या मेंदूला जबर मार, मृत्यूशी देते झुंज.. Video व्हायरल

पोलिसांनी तपासादरम्यान वाहने जप्त केली, तसेच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेनं परिसरात शोक व्यक्त केला जात असून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

    follow whatsapp