Govt Job: सरकारी बँकेत कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय मोठ्या पदावरील नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात बँकेच्या sbi.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जारी झाली असून 24 फेब्रुवारीपासून भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवार 16 मार्च 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
एसबीय (SBI) च्या या भरतीअंतर्गत आयटी सिक्योरिटी एक्स्पर्ट, इमर्जिंग टेक्नॉलॉजी, सायबर सिक्योरिटी एनालिस्ट, इंसिडेंट मॅनेजमेंट अँड फॉरेन्सिक आणि टेस्ट इंजीनिअर्स कॅडरमध्ये डेप्युटी मॅनेजर पदासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. ही पदे MMGS-II रेग्युलर असून उमेदवारांसाठी SBI मध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
काय आहे पात्रता?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे B.Tech in computer science/ बी.ई (B.E)/ कंप्यूटर सायन्स अँड इंजीनिअरिंग/ सॉफ्टवेअर इंजीनिअरिंग/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनिअरिंग किंवा संबंधित डिग्री किमान 50 टक्के गुणांसह असायला हवी. याशिवाय, एमसीए किंवा एमटेक/ कंप्यूटर सायन्समध्ये एमएससी/ कंप्यूटर सायन्स अँड इंजीनियरिंग/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ सॉफ्टवेयर इंजीनियरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स इंजीनियरिंग किंवा समकक्ष डिग्री असलेले उमेदवारा सुद्धा अर्ज करू शकतात. यासोबतच, उमेदवारांना सायबर सिक्योटिरी/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा संबंधित क्षेत्रात चार वर्षांचा अनुभव असायला हवा.
हे ही वाचा: महाराष्ट्र हादरला! भावाने सख्ख्या बहिणीचा तलवारीने गळा चिरला; जन्मदात्या आईला सुद्धा सोडलं नाही...
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं किमान वय 25 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे असणं आवश्यक आहे. 31 डिसेंबर 2026 तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
किती मिळेल पगार?
या पदांवर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 64,820 रुपये ते 93,960 रुपये वेतन दिलं जाईल. यासोबतच, कर्मचाऱ्यांना इतर सरकारी भत्ते देखील मिळतील. शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार असून भरतीसाठी कोणत्याही लेखी परीक्षेचं आयोजन केलं जाणार नाही. SBI च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल आणि एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी (PwBD) उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही.
हे ही वाचा: नागपूर: पोलीस कर्मचाऱ्याची अंबाझरी तलावात उडी मारून आत्महत्या! मुलांच्या कस्टडीवरून पत्नीसोबत वाद झाल्याने टोकाचं पाऊल...
कसा कराल अर्ज?
1. SBI च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम sbi.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
2. त्यानंतर, 'Current Openings' समोर 'Recruitment of specialist cadre officer on regular basis' लिंकवर क्लिक करा.
3. आता 'Apply Online' टॅबवर क्लिक करा.
4. वेबसाइटवर नवीन असाल तर 'Click For New Registration' लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा.
5. रजिस्ट्रेशनच्या डिटेल्सच्या आधारे लॉगिन करून आवश्यक माहिती भरून घ्या.
6. सर्व माहिती भरल्यानंतर, मागितलेले डॉक्यूमेंट्स स्कॅन करून अपलोड करा.
7. शेवटी, अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
ADVERTISEMENT











