Maharashtra Weather : राज्यात पावसाच्या विश्रांतीचे कारण काय? IMD विभागाचा अंदाज

मुंबई तक

28 Aug 2026 (अपडेटेड: 28 Aug 2026, 07:51 AM)

Maharashtra Weather : राज्यात पावसाची उघडझाप सुरूच आहे, अशातच जाणून घेऊयात 28 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

Maharashtra Weather (AI Photo)

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात पावसाची उघडझाप सुरूच

point

28 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज घ्या जाणून

Maharashtra Weather : राज्यात पावसाची उघडझाप सुरूच आहे. अशातच 28 ऑगस्ट रोजी राज्यात पावसाचा जोर मध्यम स्वरुपाचा जाणवण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे हलक्या पावसाची शक्यता राहील असा अंदाज आहे. अशातच जाणून घेऊयात 28 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Gen Z चा सरकारी नोकरी परीक्षांच्या निष्पक्षतेबाबत मूड काय?

कोकण 

कोकणातील पालघर, ठाणे आणि मुंबईत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची अधिकची शक्यता वर्तविली आहे. रायगडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची अधिकची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत देखील हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. नाशिक घाटमाथा परिसरपात मात्र मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता होण्याचा अंदाज आहे. अहिल्यानगरात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पावसासाठी कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही. 

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे, घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येते. कोल्हापूर, सातारा आणि सांगली परिसरात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, परभणी या जिल्ह्यांत हलका किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हिंगोली, लातूर आणि नांदेडमध्ये मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. 

हे ही वाचा : 18 वर्षीय सुनिताचा मृतदेह तलावात आढळला, शरीराला बांधले दगड

विदर्भ 

विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत 28 ऑगस्ट रोजी कोणताही इशारा दिलेला नाही.