Mumbai News: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टला गती मिळत असून याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकल्पासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि शिळफाटा दरम्यान बांधण्यात येणाऱ्या बोगद्याचं काम पूर्ण करण्यात यश मिळालं आहे. हा बोगदा 21 किलोमीटर लांबीचा आहे. तसेच, या मार्गावरील 2.7 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
ADVERTISEMENT
बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचं पाऊल
9 जुलै रोजी महाराष्ट्रातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि शिळफाटा दरम्यान बांधल्या जाणाऱ्या 21 किमी लांबीच्या बोगद्याच्या बांधकामात यश मिळालं असल्याचं सांगितलं जात आहे. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील हे एक महत्त्वपूर्ण हे पाऊल ठरलं आहे. मुंबई आणि अहमदाबादला हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडणे हा या प्रोजेक्टचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे या मर्गावरील प्रवासाचा वेळ अगदी कमी होईल आणि दोन्ही आर्थिक केंद्रांमधील वाहतूक कार्यक्षमता वाढेल.
शिल्फाटा आणि घणसोली दरम्यान बांधकाम...
या प्रोजेक्ट अंतर्गत शिल्फाटा आणि घणसोली दरम्यान एकूण पाच किलोमीटरचे बांधकाम न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (NATM) वापरून केले जात आहे. उर्वरित 16 किलोमीटरचे बांधकाम टनेल बोरिंग मशीन (TBM) वापरून केले जाईल. या बोगद्यात ठाणे क्रीक खालचा सात किलोमीटर लांबीचा समुद्राखालील भाग देखील समाविष्ट करण्यात आला आहे. NATM विभागात बोगद्याचे बांधकाम जलद गतीने करण्यासाठी घणसोली आणि शिळफाटा येथे एकाच वेळी खोदकाम करण्यासाठी उपयुक्त असलेला अतिरिक्त चालित मध्यवर्ती बोगदा म्हणजेच एडिशनली ड्रिवेन इंटरमीडिएट टनल (ADIT) बांधण्यात आला.
हे ही वाचा: रीलसाठी व्हिडीओ काढणं जीवावर बेतलं! स्टंट करताना कार 300 फूट दरीत....
1.62 किमी खोदकाम पूर्ण
अद्याप शिळफाटा मार्गावर सुमारे 1.62 किमी खोदकाम करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त NATM विभागातील सुमारे 4.3 किमी अंतराची एकूण प्रगती झाली असल्याची माहिती समोर आली. तसेच कोणत्याही प्रकारची समस्या टाळण्यासाठी प्रोजेक्टच्या ठिकाणी व्यापक सुरक्षा उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. या उपायोजनांमध्ये ग्राउंड सेटलमेंट मार्कर, पीजोमीटर, इनक्लिनोमीटर, स्ट्रेन गेज आणि बायोमेट्रिक एक्सेस कंट्रोल सिस्टमचा समावेश आहे. यामार्फत कोणतंही नुकसान न होता बोगदा खोदण्याचे काम सुनिश्चित पद्धतीने होत असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: "कोणाला सांगितलं तर 36 तुकडे..." घरमालकासोबत अनैतिक संबंध अन् पतीलाच धमकी! नेमकं घडलं काय?
NHSRCL च्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती
NHSRCL चे व्यवस्थापकीय संचालक विवेक कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर टनल लाइनिंग म्हणजेच बोगद्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू होईल. त्यानंतर आरसी ट्रॅक बेड टाकला जाईल आणि ट्रॅक बसवण्याचे काम लगेच सुरू होईल. पावसाळ्यानंतर लगेच महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रोजेक्टचं काम अधिक वेगानं आणि वेळेवर करण्याचा प्रयत्न असणार असल्याचं जात आहे.
ADVERTISEMENT











