Mumbai News: दररोज विविध कामांसाठी महाराष्ट्र विधानभवन किंवा मंत्रालयात जाणाऱ्या लोकांचा प्रवास डिसेंबरपासून सोपा होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) ने 306 मीटर लांबीच्या सब-वेच्या बांधकामाला गती दिली दिल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
किती काम पूर्ण?
मेट्रो-3 कॉरिडॉरच्या विधानभवन मेट्रो स्टेशन आणि मंत्रालयादरम्यानच्या भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी पायलिंगचे काम 100 टक्के पूर्ण झालं आहे. तसेच, सबवेसाठी NATM (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड) तंत्रज्ञानाचा वापर करून 74 टक्क्यांपर्यंत खोदकाम पूर्ण झालं असून आणि स्ट्रकचर तयार करण्याचे काम 24 टक्क्यांपर्यंत पर्यंत पूर्ण झालं आहे.
दोन स्वतंत्र मार्ग
या प्रकल्पांतर्गत, सुरक्षिततेच्या दृष्टीने, दोन स्वतंत्र मार्ग तयार केले जात आहेत. एक मार्ग फक्त मंत्रालय आणि विधानभवनातील कर्मचाऱ्यांसाठी असेल, तर दुसरा सामान्य जनतेसाठी असेल.
हे ही वाचा: Dahi Handi 2025: पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजे मुक्त दहिहंडीचा थरार
लोक दररोज या दोन्ही इमारतींना विशिष्ट कामानिमित्त भेट देत असतात. हीच बाब लक्षात घेऊन, 2019 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएमआरसीएल यांच्यात सबवे बांधण्यासाठी करार करण्यात आला. सुरक्षिततेच्या कारणास्तव आक्षेप घेतल्यामुळे भुयारी मार्गाचं बांधकाम थांबवण्यात आल्यानंतर आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये काम पुन्हा सुरू झालं.
हे ही वाचा: "खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही, खांद्यावर बंदूक ठेऊन...",मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार नेमकं काय म्हणाले?
काय आहे संपूर्ण प्रोजेक्ट?
मेट्रोला विधानभवन आणि मंत्रालयाशी जोडण्यासाठी 306 मीटर लांबीच्या सबवेचे बांधकाम सुरू आहे. हा सबवे विधानभवन, मंत्रालय आणि प्रशासकीय इमारतींशी जोडला जाईल. भूमिगत सबवेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत सहज जाणं शक्य होईल. मेट्रोच्या बांधकामावर 98.8 कोटी रुपये खर्च केले जात असल्याची माहिती आहे. तसेच, आरे आणि कुलाबा दरम्यान मेट्रो-३ कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. आरे ते आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो सेवा सुरू झाली असून मेट्रो प्रशासन सप्टेंबरपर्यंत ही सेवा सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे.
ADVERTISEMENT
