Govt Job: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI) ने तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे. SBI कडून ज्युनियर असोसिएट्स (कस्टमर सर्विस अॅन्ड सपोर्ट)) च्या 5,583 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया 6 ऑगस्टपासून सुरू झाली असून उमेदवार 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
काय आहे पात्रता?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पदवीधर असणं अनिवार्य आहे. यासोबतच किमान वय 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. म्हणजेच, जर तुमचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असेल आणि तुम्ही पदवी पूर्ण केली असेल, तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
किती मिळेल पगार?
SBI ज्युनियर असोसिएट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार मिळेल. सुरुवातीचा मूळ पगार दरमहा 26,730 रुपये निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये 24,050 रुपये बेसिक पे आणि पदवीधर उमेदवारांना देण्यात येणाऱ्या दोन अतिरिक्त वेतनवाढीचा समावेश आहे. जर भत्ते आणि सुविधांचा समावेश केल्यास मुंबईसारख्या महानगरांमध्ये सुरुवातीचा पगार सुमारे 46,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. यामध्ये महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वैद्यकीय आणि प्रवास भत्ता (LTT) सारख्या सुविधा देखील दिल्या जातात.
हे ही वाचा: ‘सेक्स चॅट’च्या जाळ्यात अडकला अन् 94 लाख रुपये बुडवून बसला! न्यूड फोटो अन्... मुंबईतील डॉक्टरसोबत घडलं तरी काय?
अर्जाचं शुल्क किती?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागेल. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी शुल्क 750 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. तसेच एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी कोणतंच शुल्क आकारण्यात येणार नाही.
हे ही वाचा: जिममध्ये डॉक्टरच्या मुलीचा अन् भाचीचा अश्लील व्हिडीओ काढला, मुलावर बंदूकही ताणली.. नंतर तरुणाने केलं भयंकर कृत्य!
कसं कराल अप्लाय?
1. सर्वप्रथम SBI च्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा आणि करिअर विभागात "Current Openings" वर क्लिक करा.
2. आता Recruitment of Junior Associates 2025 च्या भरतीच्या लिंकवर जा आणि "Apply Now " वर क्लिक करा.
3. त्यानंतर "Click here for New Registration" वर क्लिक करा आणि नाव, मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी सारखी आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन करा.
4. आता शैक्षणिक माहिती, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
5. शेवटी प्रवर्गानुसार अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
ADVERTISEMENT
