‘सेक्स चॅट’च्या जाळ्यात अडकला अन् 94 लाख रुपये बुडवून बसला! न्यूड फोटो अन्... मुंबईतील डॉक्टरसोबत घडलं तरी काय?

मुंबईतील एक 35 वर्षीय डॉक्टर सायबर फसवणुकीला बळी पडला आणि त्यात त्याने 94 लाख रुपये गमावले असल्याची बातमी समोर आली आहे.

‘सेक्स चॅट’च्या जाळ्यात अडकला अन् 94 लाख रुपये बुडवून बसला!

‘सेक्स चॅट’च्या जाळ्यात अडकला अन् 94 लाख रुपये बुडवून बसला!

मुंबई तक

• 11:36 AM • 17 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील डॉक्टर ‘सेक्स चॅट'ला बळी पडला

point

महिलेच्या नादात 94 लाख रुपये बुडवून बसला..

Mumbai Cyber Crime: मुंबईतील एक 35 वर्षीय डॉक्टर सायबर फसवणुकीला बळी पडला आणि त्यात त्याने 94 लाख रुपये गमावले असल्याची बातमी समोर आली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी सोशल मीडियावर महिला असल्याचं भासवून त्याच्याशी संपर्क साधला आणि नंतर त्याचे प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून मोठी रक्कम वसूल केली. अखेर, पीडित तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली, अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.

हे वाचलं का?

महागड्या भेटवस्तूंची मागणी.. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात पीडित डॉक्टरची सोम्या अवस्थी नावाच्या महिलेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली. तिने स्वतः चंदीगडमधील एमबीबीएस विद्यार्थिनी असून दिल्लीची रहिवासी असल्याची खोटी ओळख करून दिली. दोघांमधील संवाद वाढत गेला आणि त्यानंतर, महिलेने पीडित तरुणाकडे भेटवस्तू मागण्यास सुरुवात केली. पीडित डॉक्टर तिने सांगितलेल्या बँक खात्यात पैसे पाठवत राहिला पण महिलेनं कधीच खरेदीचं बिल दाखवलं नाही.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, कालांतराने त्या दोघांमध्ये 'सेक्स चॅट' सुरू झाले. महिलेने तिचे न्यूड फोटो पाठवले आणि पीडित डॉक्टरला सुद्धा प्रायव्हेट फोटो शेअर करण्यास सांगितले. पुढे मे महिन्यात, मे महिन्यात, ती मुंबईला येत असल्याचं तिने डॉक्टरला सांगितलं आणि त्यानंतर पीडित तरुणाने तिच्यासाठी बिझनेस क्लासचं तिकीट बुक केले होतं, परंतु त्यानंतर अशी कोणतीच फ्लाइट नसल्याचं समोर आलं.

हे ही वाचा: नराधम मुलाने वृद्ध आईवरच दोनदा लैंगिक अत्याचार... म्हणाला, “ही तर तुझी शिक्षा आहे...”

खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी  

2 मे रोजी, महिलेने व्हॉट्सअॅपवर 'वन टाइम व्ह्यू' फोटो पाठवला, ज्यामध्ये थायलंडमधील एका हॅकरने तिचे फोटो आणि चॅट हॅक केलं असून तो 3.10 बिटकॉइन (सुमारे 2.5 कोटी रुपये) मागत आहे, अन्यथा तो तिचे चॅट्स व्हायरल करेल, असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर, महिलेने तिचे दागिने विकून पैसे दिल्याचं तिने सांगितलं. जर पीडित डॉक्टरने पैसे दिले नाहीत तर ती त्यांचे खाजगी फोटो तिच्या ऑफिस आणि वैद्यकीय संघटनेला पाठवणार असल्याची धमकी दिली.

हे ही वाचा: मृत बाळाला दिला जन्म, पण पतीने नाकारलं अन् म्हणाला, “आधी डीएनए टेस्ट...” महिलेसोबत नेमकं काय घडलं?

फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पोलिसांकडे धाव 

त्यानंतर पीडित तरुणान घाबरून बँकांकडून कर्ज घेतले आणि सुमारे 94 लाख रुपये महिलेला पाठवले. पैसे ट्रान्सफर करताना, डॉक्टरला बँक खात्याचं नाव "जसलीन कौर" असल्याचं आढळलं, ज्यामुळे त्याला संशय आला. त्यानंतर, त्याने महिलेचं सोशल मीडिया प्रोफाइल आणि कॉलेज डिटेल्स तपासले असता त्याला कळले की 'सोम्या अवस्थी' एमबीबीएसची विद्यार्थी नसून तिने आर्ट्स शाखेत शिक्षण घेतलं आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, डॉक्टरने सायबर पोलिसांशी संपर्क साधला. शुक्रवारी अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे काही टेक्निकल  पुरावे असून आरोपींना पकडण्यासाठी पथके पाठवण्यात आली आहेत.

    follow whatsapp