GYM Shocking Video Viral : उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये जिमला गेलेल्या एका डॉक्टरची मुलगी आणि भाचीचा तरुणाने अश्लील व्हिडीओ बनवला. तरुणाने हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्यांना दिली. तसच डॉक्टरच्या मुलाला मारहाण करून त्याच्यावर बंदूक ताणली. पीडित डॉक्टरने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. घटनेनंतर डॉक्टर कुटुंबीय खूप घाबरले आहेत. ते पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
ADVERTISEMENT
त्या जिममध्ये नेमकं काय घडलं होतं?
हे धक्कादायक प्रकरण मेरठच्या पल्लवपुरम पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलं. रुडकी रोड शीलकुंज येथे राहणाऱ्या डॉक्टरांनी आरोप केला आहे की, जिममध्ये त्यांची मुलगी, भाची आणि मुलासोबत ही धक्कादायक घटना घडली. पीडित डॉक्टरने म्हटलं की, त्यांची मुलगी, भाची आणि मुलगा एका प्रतिष्ठित जिममध्ये व्यायाम करतात. जिममध्ये एक तरुणही व्यायाम करायला येतो. त्या तरुणाने एक दिवस मुलीचा आणि भाचीचा व्यायाम करताना अश्लील व्हिडीओ काढला. त्यानंतर त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
हे ही वाचा >> EVM मतदानाची फेरमतमोजणी, सुप्रीम कोर्टामुळे हरलेला उमदेवार जिंकला.. देशातील पहिलीच घटना प्रचंड चर्चेत
मुलगी आणि भाचीने या प्रकरणाबाबत जिमच्या कोचकडे तक्रार केली. त्यानंतर त्या तरुणाला पकडण्यात आलं. कोचने तरुणाला सुनावलं आणि मोबाईलमधून व्हिडीओ डिलिट करायला सांगितलं. जिम कोचने तरुणाला माफी मागायला लावली. त्यानंतर तरुणाला सोडून दिलं. डॉक्टरांनी सांगितलं की, तो मुलगा आता सुधारेल आणि पुन्हा चूक करणार नाही, अशी अपेक्षा होती. पण थोड्या दिवसानंतर त्याने पुन्हा मुलांना त्रास देणं सुरु केलं.
धक्कादायक बाब म्हणजे, तरुणाने डॉक्टरच्या मुलाला रस्त्यात अडवून त्याच्यावर बंदूक ताणली आणि धमकी दिली. तर एसएसपी डॉ. विपिन ताडा यांनी याप्रकरणी सीओ दौराला यांना तपास करून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की, याप्रकरणात जे काही उघडकीस येईल, त्या आधारावर कारवाई केली जाईल.
हे ही वाचा >> पत्नी पतीकडे येत नव्हती म्हणून... सगळ्या मर्यादाच ओलांडल्या अन् स्वत:च्या चार मुलांना सुद्धा...
ADVERTISEMENT
