मुंबई: निर्दयीपणाचा कळस.. 15 दिवसांचं बाळ सोडलं लोकलमध्ये टाकलं अन्.. ती महिला कोण?

Mumbai Crime News : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल - पनवेल लोकल ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क एका महिलेनं जन्म दिलेल्या 15 दिवसाच्या नवजात बाळाला सोडलं आणि सामान हातात घेऊन उतरता येत नसल्याच्या बहाण्याने पळ काढला.

mumbai crime news

mumbai crime news

मुंबई तक

02 Jul 2025 (अपडेटेड: 02 Jul 2025, 10:07 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवजात बाळाला सोडून महिलेनं काढला पळ

point

वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai Crime News : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल- पनवेल लोकल ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क एका महिलेनं जन्म दिलेल्या 15 दिवसाच्या नवजात बाळाला दुसऱ्या एका महिलेच्या हातात दिलं आणि पळ काढला. ही घटना सोमवारी (30 जून) रोजी सीवूड्स रेल्वे स्थानकावर दुपारी घडली आहे. या प्रकरणी आता वाशी पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला भेटायला बोलावलं, दोघांमध्ये वाद झाला अन् गर्लफ्रेंडची सटकली थेट ब्लेडनं गुप्तांगच छाटलं

नेमकं प्रकरण काय? 

मुंबईतील रहिवासी दिव्या नायडू (वय 19) नावाची महिला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मैत्रीण भूमिका मानेसोबत सीएसएमटीहून जुईनगरकडे जात होत्या. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास, ट्रेन स्थानकाजवळ येताच, दोन्ही मैत्रिणी जुईनगर स्थानकावर उतरण्याच्या तयारीतच होत्या. त्याच रेल्वेच्या डब्ब्यात एक महिला होती, त्यावेळी तिनं आपल्याकडे काही सामानाच्या बॅग असल्याने तिला खाली उतरता येणार नसल्याचं सांगितलं. त्या महिलेनं आपल्याकडे असलेलं बाळ दुसऱ्या महिलेच्या हातात दिलं. सीवूड्सपर्यंतच बाळाला सोबत ठेवण्याची मदत मागितली. मात्र, त्यनंतर संधी साधून संबंधित महिलेन पळ काढला.

संधी साधून पळ

सीवूड्स येथे उतरणार अशी संबंधित महिलेनं माहिती दिली होती. त्यावेळी ती महिला सीवूड्स स्थानकावर आपल्या हातात बाळ घेऊन उभीच होती. पळून गेलेली महिला पुन्हा येईल या आशेनं तरुणी स्टेशनवर उभ्या होत्या. महिलेची वाट पाहूनही पळून गेलेली महिला तिथं पुन्हा आलीच नाही. शेवटी जुईनगर येथे माने नावाच्या तरुणीने बाळाला आपल्या घरी नेलं आणि त्याची काळजी घेण्यात आली. मानेच्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार, वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

हेही वाचा : मुंबई हादरली! अल्पवयीन विद्यार्थ्याला शिक्षिका घेऊन जायची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अन्... शिक्षिक विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा

संबंधित प्रकरणातील तक्रारीवरुन, बाळाला सोडून दिल्याबद्दल अज्ञात महिलेवर भारतीय न्यासंहिता कलम 93 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची ओळख पटण्यासाठी सीसीटीव्ही तपासले जात आहेत. 

    follow whatsapp