काशीमिरा पोलीस ठाणे परिसरात अभिनेत्री पोलिसांच्या जाळ्यात, सेक्स रॅकेटचं मोठं कांड आलं समोर, नेमकं काय घडलं

mumbai crime : मुंबईतील काशीमिरा पोलीस ठाणे परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका अभिनेत्रीनंच हे सेक्स रॅकेट चालवलं गेल्याचं बोललं जातंय.

Kashimira sex racket

Kashimira sex racket

मुंबई तक

• 01:37 PM • 05 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील काशीमिरा पोलीस ठाणे परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

point

अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट

point

'असा' झाला पर्दाफाश

mumbai crime : मुंबईतील काशीमिरा पोलीस ठाणे परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका अभिनेत्रीनंच हे सेक्स रॅकेट चालवलं गेल्याचं बोललं जातंय. त्या अभिनेत्रीचं नाव अनुष्का मोनी (वय 41) असे आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे. या सेक्स रॅकेटमध्ये काही टीव्ही मालिका आणि बंगाली सिनेमातील महिला कलाकार असल्याची माहिती समोर आली होती. आता महिला कलाकारांची सुटका करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : महिला आयपीएस अंजली कृष्णा अजित पवारांना थेट नडल्या, वाळू तस्करी करणाऱ्यांचे उपटले कान, फोन कॉलवर काय घडलं?

नेमकं काय घडलं? 

संबंधित प्रकरणाची सूत्रांद्वारे माहिती मिळाल्यानंतर दोन बनावट ग्राहत तयार करण्यात आले. आरोपींनी ग्राहकांना मुंबई-अहमदाबाद महमार्गालगतच्या काशीमिरा येथील एका मॉलमध्ये बोलावण्यात आले होते. त्याचक्षणी पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडलं असता, बेड्या ठोकल्या आहेत, तर पोलिसांनी दोन मालिका कलाकारांना सोडवलं आहे.

सेक्स रॅकेटमागे कोण? 

या प्रकरणी आता भारतीय दंड संहिता कलम 370 (3) कलमांन्वये आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितलं की, या सेक्स रॅकेटमागे इतर काही व्यक्ती दलाल आणि नेटवर्कबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.

हे ही वाचा : कोल्हापूर हादरलं! मित्रांचं सुरु होतं संभाषण, अचानक बोलणंच खटकलं, नंतर धारदार शस्त्राने मित्राचाच गळा चिरला अन् ...

पोलिसांनी सांगितलं की, हे रॅकेट उच्चभ्रू समाजातील लोकांसाठी चालवले जाते. आरोपी अभिनेत्री हे सर्व चालवणाऱ्या अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. या घटनेनं मनोरंजन विश्वाला चांगलाच धक्का बसला आहे. पोलिसांनी संबंधित प्रकरणात लक्ष घालत आणखी काही माहिती मिळू शकते का याचा तपास केला जात आहे.

    follow whatsapp