दूधात भेसळ ते अस्वच्छता, तुकाराम मुंढेंनी मुंबईत 5 हॉटेल्सचा बाजार उठवला..

मुंबई तक

18 Jul 2026 (अपडेटेड: 18 Jul 2026, 11:17 AM)

mumbai fda action : धाराशिवमधील दूध भेसळ प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाने मुंबईसह उपनगरांमध्ये मोठी धडक कारवाई केली. अनेक नामांकित हॉटेल्स, डेअरी आणि आस्थापनांचे परवाने निलंबित करत भेसळ व अस्वच्छतेवर कठोर कारवाई करण्यात आली.

mumbai fda action

mumbai fda action

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दूधात भेसळ ते अस्वच्छता

point

तुकाराम मुंढेंनी मुंबईत 5 हॉटेल्सचा बाजार उठवला..

mumbai fda action : धाराशिवमध्ये तब्बल 23 लाख लिटर दुधामध्ये भेसळ झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर कारवाईचा धडाका सुरू केला असून त्याचा मोठा फटका आता मुंबईतील अनेक नामांकित हॉटेल्स, डेअरी आणि खाद्य व्यवसायांना बसला आहे. मुंबईच्या कोर भागासह उपनगरांमध्ये धाडी टाकून केलेल्या तपासणीत अनेक ठिकाणी अस्वच्छता, अन्नपदार्थांमधील गंभीर त्रुटी आणि भेसळीचे प्रकार समोर आल्याने तीन ते चार हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'तिनं दुसऱ्यावर प्रेम करावं, हा विचारच मला सहन होत नव्हता..' तरुणीवर कॉलेजमध्येच सपासप वार

मुंबईकरांची पसंती असलेल्या अनेक आस्थापनांवर कारवाई

या कारवाईमध्ये चर्चगेट परिसरातील प्रसिद्ध पारशी डेअरी फार्म, मोहम्मद अली रोडवरील शालीमार हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड, तसेच गोरेगाव, गोवंडी आणि भेंडी बाजार परिसरातील अनेक आस्थापनांचा समावेश आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या आणि मुंबईकरांची पसंती असलेल्या काही आस्थापनांवरही ही कारवाई झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याशिवाय रुस्तम आईस्क्रीम या प्रसिद्ध आस्थापनाचाही परवाना रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा : मोठी बातमी : सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलं, उपोषणामुळे प्रकृती खालावली

अस्वच्छ स्वयंपाकघर, तेलाचे थर, माशा आणि कीटकांचा मुक्त वावर

मुंबईतील पारशी डेअरी फार्ममध्ये केलेल्या तपासणीत अत्यंत अस्वच्छ परिस्थिती आढळून आली. माशांचा वावर, भिंतींवर बुरशी, कच्चा माल थेट जमिनीवर ठेवलेला, सांडपाणी व्यवस्थापनातील त्रुटी, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदींचा अभाव तसेच पॅकिंगवर आवश्यक माहिती नमूद नसल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदवले. या गंभीर त्रुटींमुळे संबंधित आस्थापनाचा एफएसएसएआय परवाना रद्द करण्यात आला. त्यानंतर 13 आणि 14 जुलै 2026 रोजी मुंबईतील विविध भागांमध्ये टाकलेल्या धाडीत मोहम्मद अली रोडवरील शालीमार हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तब्बल 25 गंभीर त्रुटी आढळल्या. अस्वच्छ स्वयंपाकघर, तेलाचे थर, माशा आणि कीटकांचा मुक्त वावर, दूषित पिण्याचे पाणी तसेच आवश्यक चाचण्यांचा अभाव यामुळे या हॉटेलचाही परवाना निलंबित करण्यात आला. याच परिसरातील नूर मोहम्मदी हॉटेल आणि उमरखेडी येथील रहमानिया रेस्टॉरंटवरही कारवाई करण्यात आली.

पालघरमधील शिव डेरीमधून 181 किलो पनीर जप्त

कारवाई केवळ मुंबईच्या मध्यवर्ती भागापुरती मर्यादित न राहता उपनगरांपर्यंतही पोहोचली. गोरेगावमध्ये दुधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करून विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली असून 822 दुधाच्या पिशव्यांमधील साडेतीनशे लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. गोवंडीतील सुफी डेरीमध्ये नियमांचे उल्लंघन करून 1,683 लिटर सैल पाश्चराईज्ड म्हशीचे दूध विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळल्याने ते दूध नष्ट करून डेरीचा परवाना निलंबित करण्यात आला. मुलुंडमधील अग्रवाल एंटरप्राइजेसमधून विनालेबल 61.25 किलो चीज आणि संशयास्पद पनीर जप्त करण्यात आले. ग्राहकांना विकले जाणारे सैल पनीर प्रत्यक्षात कृत्रिम चीज असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पालघरमधील शिव डेरीमधून 181 किलो पनीर जप्त करण्यात आले असून वैध नोंदणी व परवाना नसल्यामुळे कारवाई करण्यात आली. वसई-पालघर परिसरातही अशाच प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.

मुंबईबरोबरच सांगली जिल्ह्यातही दोन महत्त्वाच्या कारवाया करण्यात आल्या. मिरज तालुक्यातील सलगरे येथे बजरंग पाटील यांच्या गोठ्यावर दुधातील स्निग्धांश कृत्रिमरीत्या वाढवण्यासाठी रिफाइंड सनफ्लॉवर तेलाचा वापर केल्याचा संशय आल्याने दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच रामचंद्र पाटील यांच्या गोठ्यावर डेअरी पावडर आणि रिफाइंड सोयाबीन तेलाचा वापर करून कृत्रिम दूध तयार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि तेथील भेसळयुक्त दूधही अधिकाऱ्यांनी जप्त करून नष्ट केले. याशिवाय जोगेश्वरी पश्चिम येथील जे. के. सोप बाजारवर टाकलेल्या धाडीत 10 लाख 93 हजार 692 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उत्पादनामध्ये चुकीचे घटक वापरल्याचा संशय आल्याने प्रयोगशाळा तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले असून संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. राज्यभर सुरू असलेल्या या धडक कारवायांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने भेसळ, अस्वच्छता आणि नियमभंगाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.