मुंबई: मुंबईत 'मिठी' नावाची एक नदी वाहते याची जाणीव मुंबईकरांना वीस वर्षांपूर्वी झाली. पण या मिठी नदीचा नाला झाला आहे. नदी पात्राचं, खोलीकरण, रुंदीकरण करुन मिठी नदीतून गाळ काढण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करुनसुद्धा मिठी नदी स्वच्छ झालेली नाही. म्हणून लोक तिला मिठी नदी न म्हणता मिठी नालाच म्हणताहेत.
ADVERTISEMENT
पण निवडणुकांसाठी, राजकारणासाठी तरी मिठी नदी पुन्हा तिच्या मूळ रुपात येईल का? यावरच मुंबई Tak ने केलेली ही ‘मिठी नदी कशी मेली- एका नदीचं मरण’ ही एक विशेष डॉक्युमेण्ट्री.
आजचा दिवस आहे 26 जुलै 2025 म्हणजेच मुंबईत जो महाभयानक पूर आला होता त्याला आज तब्बल 20 वर्ष पूर्ण झाली आहे. पण तरीही मुंबईतील मिठी नदीचा प्रश्न कायम आहे. याच परिस्थितीवर उजेड टाकणारी आणि राजकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारी मुंबई Tak ची विशेष डॉक्युमेण्ट्री आवर्जून पाहा!
पाहा मिठी नदीवरची विशेष डॉक्यूमेंट्री
ADVERTISEMENT
