Mumbai hit and run case : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात रविवारी दुपारी झालेल्या अपघातात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. जॉन बॅप्टिस्ट रोड ओलांडत असताना या मुलाला इनोव्हा क्रिस्टाने धडक दिली. या प्रकरणी पोलिसांनी कार चालवणाऱ्या 45 वर्षीय मेघा रावल यांना अटक केली आहे. अपघाताच्या वेळी त्या फोनवर बोलत असल्याचा आणि कार वेगाने चालवत असल्याचा आरोप असून, पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: तुमच्या नावावर कुठे-कुठे आहे पैसा? एका दिवसात 'असा' शोधा सगळा पैसा!
रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला धडक
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे 2.15 वाजता मेघा रावल या जॉन बॅप्टिस्ट रोडवरून इनोव्हा क्रिस्टा चालवत होत्या. त्या पोषणतज्ज्ञ आहेत. रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाला त्यांच्या कारने धडक दिली. अपघाताच्या वेळी रावल फोनवरील संभाषणामुळे विचलित झाल्या होत्या आणि कारचा वेगही जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पाऊस मंदावला, पण 'या' विभागातील जिल्ह्यांना यलो अलर्ट
बेदरकारपणे कार चालवणाऱ्या महिलेला अटक
कारची धडक बसल्यानंतर मुलाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने मुलाला जवळच्या होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये नेले. विशेष म्हणजे, ज्या कारने मुलाला धडक दिली त्याच कारमधून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.
या घटनेनंतर पोलिसांनी मेघा रावल यांना अटक केली. अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, तसेच कारचा वेग आणि फोनवरील संभाषणामुळे चालकाचे लक्ष विचलित झाले होते का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. जॉन बॅप्टिस्ट रोडवर घडलेल्या या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिस सध्या घटनेशी संबंधित परिस्थितीची चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT












