mumbai malad west pet dog lift attack cctv : मुंबईतील मालाड वेस्ट येथील शेठ आयरीन हायराइज सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याने अचानक आक्रमक होत तीन मुलींवर हल्ला केला. ही संपूर्ण घटना लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेच्या वेळी लिफ्टमध्ये आधीपासून तीन मुली उभ्या होत्या. त्यानंतर एक महिला आपल्या पाळीव कुत्र्यासह लिफ्टमध्ये आली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचललं, मला मारहाण झाली; दिपकेंचे आरोप अन् पोलिसांचं स्पष्टीकरण
कुत्र्याच्या हल्ल्यानंतर लिफ्टमध्ये एकच गोंधळ
लिफ्टचा दरवाजा बंद होताच कुत्रा अचानक मुलींकडे धावून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे लिफ्टमध्ये एकच गोंधळ उडाला. मुली घाबरून मागे सरकल्या. कुत्र्याला आवरण्यासाठी महिला सतत प्रयत्न करत होती. काही वेळ ती कुत्र्याला पकडून ठेवण्यासाठी झटताना दिसली. काही क्षणांनी लिफ्टचा दरवाजा उघडला. त्यानंतर एक मुलगी लगेच बाहेर पळाली. मात्र कुत्र्याने तिच्या मागे जाण्याचाही प्रयत्न केला. त्याच वेळी महिलेने कुत्र्याला मागे खेचले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, लिफ्टमध्ये घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
हेही वाचा : मोठी बातमी : सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलं, उपोषणामुळे प्रकृती खालावली
तीनही मुली घाबरल्याचे आणि स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते. कुत्र्याच्या अचानक बदललेल्या वर्तनामुळे महिला देखील काही क्षण गोंधळून गेली. त्यानंतर तिने कुत्र्याला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कुत्र्याला आवरण्यासाठी ती सतत झटत असल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते.
ADVERTISEMENT












