मुंबई: कांदिवलीत धावत्या बसला भीषण आग, संपूर्ण परिसरात आगीचे लोट; वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काय घडलं?

कांदिवली पूर्व समतानगर येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. धावत्या डबल डेकर बसला अचानक आग लागल्याच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कांदिवलीत धावत्या बसला भीषण आग,

कांदिवलीत धावत्या बसला भीषण आग,

मुंबई तक

• 12:12 PM • 20 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

कांदिवलीत धावत्या बसला भीषण आग

point

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील धक्कादायक घटना

Mumbai News: मुंबईतील कांदिवली परिसरात एक धक्कदायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. कांदिवली पूर्व समतानगर येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. धावत्या डबल डेकर बसला अचानक आग लागल्याच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हे वाचलं का?

डबल डेकर बसला लागली भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्व समतानगर येथील वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावर एका धावत्या डबल डेकर बसला अचानक भीषण आग लागली. अचानक आग लागल्याने, बसमधील प्रवासी स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले आणि लगेच बसमधून बाहेर पडले, त्यामुळे सुदैवाने कोणत्याच प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला नाही. बसला आग लागल्याची माहिती मिळताच, अग्निशमल दलाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर, आग आटोक्यात आली. 

हे ही वाचा: सफाई कामगार महिलेच्या ईमानदारीपुढे सोनंही फिकं पडेल, 45 लाख रुपयांच्या सोन्याने भरलेली बॅग पोलिसांकडे सोपवली

प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात 

अचानक धावत्या बसला आग लागल्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. आता अग्निशमन दलाचे अधिकारी या घटनेचा पुढील तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. 

    follow whatsapp